esakal | 7th Pay Commission: AIIMS नागपूरमध्ये भरती; २ लाख पगार आणि भत्तेही मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

AIIMS_Nagpur

अधिक माहितीसाठी बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंकवर जाऊन सविस्तर अधिसूचना पाहू शकता.

7th Pay Commission: AIIMS नागपूरमध्ये भरती; २ लाख पगार आणि भत्तेही मिळणार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

AIIMS Nagpur Recruitment 2021 : पुणे : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूरमध्ये फॅकल्टी ग्रुप-एच्या विविध विभागातील अनेक पदांवर थेट भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ई-मेलद्वारे ७ एप्रिल २०२१ पर्यंत तर पोस्टाद्वारे २२ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करावेत. 

खालील विभागांमध्ये होणार भरती
एम्स नागपूर भरती २०२१च्या अधिसूचनेनुसार, एंडोक्रिनोलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, मेडिकल ऑन्कोलॉजी, नियोनेटोलॉजी, न्यूरॉलॉजी, ऑप्थल्मोलॉजी, रेडियोडायग्नोसिस, सर्जिकल ऑन्कोलॉजी, रेडियोडायग्नोसिस, ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमा अॅण्ड इमर्जन्सी या विभागात सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांवर भरती करण्यात येणार आहे.

खुशखबर! आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, भौतिकशास्त्राची नाही गरज​

रिक्त पदांचा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १७ पदे भरली जाणार आहेत. त्यात सहयोगी प्राध्यापकांच्या ५ तर सहाय्यक प्राध्यापकांच्या १२ रिक्त पदांचा समावेश आहे. 

७व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी
सहयोगी प्राध्यापक पदासाठी ७व्या वेतन आयोगाच्या लेवल- १३ए१ नुसार १,३८,३०० ते २,०९,२०० रुपये वेतन आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी लेवल- १२ नुसार १,०१,५०० ते १,६७,४०० रुपये आणि एनपीए (लागू असल्यास) सीपीसीसह सामान्य भत्ते मिळतील. 

नोकरीतून ब्रेक घेताय नो टेन्शन, व्हर्च्युअल इंटर्नशीप आहे ना​

अर्ज शुल्क
'डायरेक्टर एम्स नागपूर' यांच्या नावाने उमेदवारांना डिमांड ड्राफ्टद्वारे २००० रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागतील. तसेच अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंकवर जाऊन सविस्तर अधिसूचना पाहू शकता.

असा करा अर्ज
अधिसूचना नीट वाचल्यानंतर उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अॅप्लिकेशन फॉर्म पुढील पत्त्यावर पाठवावा. 
पत्ता- एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट नंबर २, सेक्टर २०, एमआयएचएएन, नागपूर- ४४११०८.

हे कोर्सेस केले तर फुल्ल पैसे छापू शकता​

AIIMS Nagpur Recruitment 2021 Application Form साठी येथे ► क्लिक करा 

अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)