Air force recruitment 2021: हवाई दलात २५५ जागांची भरती; लगेच करा अर्ज

IAF
IAF

Air force recruitment 2021: नवी दिल्ली/ पुणे : सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. हवाई दलात साउथ वेस्टर्न एअर कमांडमधील ग्रुप सी सिव्हिलियनच्या विविध पदांवरील एकूण २५५ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावे लागणार आहे. आणि तो अर्ज ३० दिवसांच्या आत जमा करावे लागणार आहे. 

असा करा अर्ज
उमेदवारांनी अधिसूचनेसह प्रसिद्ध करण्यात आलेला अर्जाचा फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून पुढील ३० दिवसांमध्ये अर्ज हवाई दलाच्या पत्त्यावर जमा करावा लागणार आहे.

या पदांसाठी होणार भरती :
- मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) - ६१ पदे
- लिपी हिंदी टंकलेखक - २ पदे
- एलडीसी - ११ पदे
- स्टेनो ग्रेड 2 - ४ पदे
- मेस स्टाफ - ४७ पदे
- सीएमटीडी (ओजी) - ३८ पदे
- हाऊस कीपिंग स्टाफ (एचकेएस) - ४९ पदे
- लाँड्रीमॅन - ९ पदे
- व्हल्कॅनाइझर - २ पदे
- कूक (ओजी) - ३८ पदे
- स्टोअर कीपर - ३ पदे
- पेंटर - ४ पदे
- कूक - ३ पदे
- आया / प्रभाग सहाय्यक - १ पद
- कारपेंटर - ३ पदे
- स्टोअर (सुप्रीटेंडेंट) - ३ पदे
- फायरमॅन ​​- ८ पदे 

आवश्यक पात्रता -
एमटीएस, एचकेएस, मेस स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, आया, वॉर्ड सहाय्यक आणि व्हल्कॅनाइझर - कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता.

एलडीसी - कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता. तसेच इंग्रजी (प्रति मिनिट ३५ शब्द) आणि हिंदी (प्रति मिनिट ३० शब्द) टंकलेखन (टायपिंग) आवश्यक.

क्लर्क हिंदी टायपिस्ट - कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता. तसेच संगणकावर हिंदीमध्ये प्रति मिनिट ३० शब्द टंकलेखन आवश्यक

- इतर पदांच्या आवश्यक पात्रता आणि माहितीसाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com