AYUSH Entrance Exam Result : अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

पुण्यातील सानिका आफळे देशात दुसऱ्या क्रमांकावर
Sanika Aafale
Sanika AafaleSakal

पुणे - राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा (ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅच्युएट एन्ट्रस टेस्ट- एआयएपीजीईटी) निकाल जाहीर केला आहे.

आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी यातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही परीक्षा घेण्यात आली. पुण्यातील डॉ. सानिका आफळे या परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर (ऑल इंडिया रॅंक) दुसऱ्या, तर खुल्या गटात पहिल्या आल्या आहेत.

नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसीन आणि नॅशनल कमिशन फॉर होमोओपॅथी यांच्या वतीने ‘एनटीए’ने ही परीक्षा घेतली. देशातील सरकारी, अनुदानित, राष्ट्रीय संस्था, केंद्रीय आणि अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

देशातील ९५ शहरांमधील १७० केंद्रांवर ही परीक्षा ३१ जुलै रोजी झाली. देशातील ३८ हजार ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३६ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी :

विषय : विद्यार्थी : विद्यार्थिनी : एकूण

आयुर्वेद : ८,९६४ : १५,६८६ : २४,६५०

होमिओपॅथी : २,५१३ : ६,२०५ : ८,७१८

सिद्ध : २२५ : ६७९ : ९०४

युनानी : ९५१ : १,२४६ : २,१९७

एकूण : १२,६५३ : २३,८१६ : ३६,४६९

‘पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतले. पदवी शिक्षणातील अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच ‘एआयएपीजीईटी’ परीक्षा दिली. आयुर्वेदात पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्पेशलायझेशन करण्याची इच्छा आहे. एआयएपीजीईटी परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर (ऑल इंडिया रॅंक) दुसऱ्या तर खुल्या गटात पहिल्या क्रमांक मिळाल्याचा आनंद आहे.’

- डॉ. सानिका आफळे (एआयएपीजीईटी परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांक मिळालेल्या)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com