esakal | IIT च्या प्रवेश परीक्षेची घोषणा, वाचा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

IIT-Delhi PhD student found dead in hostel

IIT च्या प्रवेश परीक्षेची घोषणा, वाचा डिटेल्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय तंत्रज्ञान संस्थांतील (IIT) प्रवेशांसाठी सामाईक पदव्युत्तर प्रवेश परिक्षेची (जाम २०२२) ची घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान शाखेतील पदव्युत्तर आणि पीएच.डी प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. आयआयटी (IIT) रूडकीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेला ऑनलाइन (Online) अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे. (Announcement IIT entrance exam)

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीची ही प्रवेश परिक्षा असून, संगणकाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे. दोन वर्षाचा एम.एस्सी. किंवा एम.टेक, तसेच स्वतंत्र पीएच.डी.साठी किंवा दोन्ही एकत्र असलेल्या एम.एस्सी.-पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थी एक किंवा आवश्यकता वाटल्यास दोन ‘टेस्ट पेपर’ देऊ शकतो. त्यासाठी त्यांना अधिकचे शुल्क भरावे लागेल.

हेही वाचा: कोरोना लढ्यासाठी केंद्राने राज्यांना आतापर्यंत दिले 1827 कोटी

परीक्षेचा तपशील -

जाम २०२२ ही वस्तुनिष्ठ परीक्षा असून यात प्रकारातील प्रश्न विचारले जातात. १) एकच उत्तर असलेले बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) २) एका पेक्षा अधिक उत्तरे असलेले प्रश्न (एमएसक्यू) ३) गणिती आकडेमोड असलेली उत्तरे

महत्त्वाच्या तारखा -

ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : ३० ऑगस्ट

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण बंद होणार : ११ ऑक्टोंबर

जाम २०२२ परीक्षा : १३ फेब्रुवारी २०२२

परीक्षेचा निकाल : २२ मार्च २०२२

हेही वाचा: नितीन गडकरी मला तुमची मदत हवी आहे - मुख्यमंत्री ठाकरे

या विषयांसाठी होणार ‘जाम’-

जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूशास्त्र, गणित, संख्याशास्त्र आणि भौतिकशास्त्र

या संस्थांमध्ये प्रवेशासाठी उपयुक्त -

भारतीय विज्ञान संस्था बंगळूर (आयआयएस्सी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयआयईएसटी शिबपूर, एसएलआयईटी पंजाब.

प्रवेशासाठी संकेतस्थळ :

https://jam.iitr.ac.in/

loading image
go to top