esakal | UPSC Cmx Exzam : असा करा अर्ज; अधिसूचना जारी
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC Cmx Exzam : असा करा अर्ज; अधिसूचना जारी

UPSC Cmx Exzam : असा करा अर्ज; अधिसूचना जारी

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससीतर्फे ८३८ पदे भरती केली जाणार आहेत. ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज भरण्यापूर्वी काळजीपूर्वक अधिसूचना वाचावी. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत सूचना तपासू शकतात. (Apply-to-UPSC-Cmx-Exzam-Notification-issued)

पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा एमबीबीएसच्या लेखी व व्यावहारिक परीक्षेत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय हे ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. लेखी परीक्षा ५०० गुणांची असेल. त्यात दोन पेपर असतील. दोन्ही पेपर्समध्ये २५० गुणाचे १२० १२० प्रश्न असतील. हे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवाराला दोन तासांचा अवधी दिला जाईल.

हेही वाचा: बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुणांची नकारात्मक मर्किंग देखील असेल. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. ही मुलाखत १०० गुणांची असेल. इच्छुक व पात्र उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in वर २७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यूपीएससी सीएमएस परीक्षा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट भेट द्या.

परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य सेवेतील कनिष्ठ स्केल पदे, रेल्वे मधील साहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, नवी दिल्ली नगरपालिका परिषदेत जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, पूर्व दिल्ली महानगरपालिका, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि दक्षिण दिल्ली महानगरपालिकेत ऑफिसर - २ची ८३८ पदे भरती केली जातील. ज्यामध्ये कनिष्ठ स्केल पदाच्या ३४९ पदे, साहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३०० पदे, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरची ५ पदे आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर - २ ची १८४ पदांचा समावेश आहे.

(Apply-to-UPSC-Cmx-Exzam-Notification-issued)

loading image