NTPC Recruitment | अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NTPC Recruitment

NTPC Recruitment : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

मुंबई : अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने सहाय्यक अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे. (NTPC Assistant Officer Recruitment 2022)

हेही वाचा: ITBP recruitment : दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; ७० हजारापर्यंत पगार

एकूण पदे - २०

वय मर्यादा

ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पात्रता

सहाय्यक अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांकडे ६०% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित इतर तपशीलांसाठी भरती अधिसूचना वाचावी.

पगार

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 1,20,000 रुपये वेतन दिले जाईल.

हेही वाचा: Army Recruitment : भारतीय सैन्यात नोकरीची संधी; मिळू शकतो १ लाख रुपये पगार

अर्ज फी

सामान्य श्रेणी, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये भरावे लागतील. तर महिला उमेदवार, एससी आणि एसटी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज

१. - अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम careers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

२. - दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाइटच्या होमपेजवरील जॉब्स विभागात जा आणि Apply for Recruitment टॅबवर क्लिक करा.

३. - टॅबवर क्लिक केल्यानंतर एक लॉगिन पृष्ठ उघडेल.

४. - आता त्या पृष्ठावर लॉग इन करा आणि तुमचा फॉर्म भरा.

५. - अर्ज भरल्यानंतर फी भरा.

६. - शेवटी भविष्यातील वापरासाठी अर्जाची हार्ड कॉपी ठेवा.

Web Title: Ntpc Recruitment Govt Job Opportunity For Engineering Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Engineering