DRDO Recruitment 2022 | आयटीआय उत्तीर्णांसाठी डीआरडीओमध्ये नोकरीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DRDO Recruitment 2022

DRDO Recruitment 2022 : आयटीआय उत्तीर्णांसाठी डीआरडीओमध्ये नोकरीची संधी

मुंबई : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बायो-एनर्जी रिसर्च मध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या प्रशिक्षणार्थी भरतीद्वारे एकूण २२ पदे भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे उमेदवारांची निवड एका वर्षासाठी केली जाईल. (DRDO Recruitment 2022)

एकूण पदे - २२

पात्रता

या पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांकडे आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार भरती अधिसूचना पाहू शकतात.

स्टायपेंड

या शिकाऊ उमेदवारीसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला ६ हजार रुपये मानधन दिले जाईल. उमेदवारांची निवड एका वर्षासाठी केली जाईल.

असा करा अर्ज

१. - सर्वप्रथम DRDO शिकाऊ अर्जासाठी apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जा.

२. - वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर स्वतःची नोंदणी करा आणि तुमचे खाते तयार करा.

३. - नोंदणी केल्यानंतर आता लॉगिन करा आणि अर्ज भरा.

४. - फॉर्म भरल्यानंतर, तो सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.