Assam Rifles Recruitment Rally 2022: रायफलमॅन जीडी पदांसाठी भरती; असा करा अर्ज

आसाम रायफल्सने रायफलमॅन जीडी आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
Assam Rifles Recruitment Rally
Assam Rifles Recruitment RallySakal

Assam Rifles 2022: आसाम रायफल्सने रायफलमॅन जीडी आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार आसाम रायफल्सच्या अधिकृत साइट assamrifles.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज (Application) करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2022 आहे. या भरतीतून 152 पदे भरली जाणार आहेत. ही भरती आसाम रायफल्सच्या पात्र आश्रित कुटुंबातील सदस्यांसाठी लागू आहे. एखाद्या मोहीमेत किंवा कारवाईत मरण पावलेल्या, सेवेत असताना मरण पावलेल्या, वैद्यकीय कारणास्तव सेवेतून दूर झालेल्या आणि सेवेत असताना बेपत्ता झालेल्या जवानांच्या कुटूंबातील सदस्यांसाठी ही भरती केली जाणार आहे. (Assam Rifles Recruitment Rally 2022)

Assam Rifles Recruitment Rally
CISF मध्ये 1149 पदांसाठी मोठी भरती; 12 वी विद्यार्थीही करु शकतात अर्ज

उमेदवार पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खालीलप्रमाणे:

रायफलमन जनरल ड्युटी: 94 पदे

हवालदार लिपिक: 4 पदे

वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक: ४ पदे

हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाइन: 37 पदे

रायफलमन आर्मर: 2 पदे

रायफलमन प्रयोगशाळा सहाय्यक: 1 पद

रायफलमन नर्सिंग असिस्टंट: 5 पदे

रायफलमन वॉशरमन: ४ पदे

रायफलमॅन अया: 1 पोस्ट

Assam Rifles Recruitment Rally
रेल्वेत 3 हजारांहून अधिक पदांसाठी भरती; 10 वी विद्यार्थीही करु शकतात अर्ज

पात्रता-

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी assamrifles.gov.in लिंकवर जाऊ शकतात.

निवड अशी होईल-

उमेदवारांना लेखी परीक्षेतून सूट दिली जाईल. तपशीलवार वैद्यकीय तपासणी (DME) करण्यापूर्वी सर्व तांत्रिक आणि ट्रेडमन ट्रेड (कौशल्य) चाचणी घेतली जाईल. उमेदवारांचे ट्रेड टेस्टमध्ये उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण म्हणून मूल्यांकन केले जाईल.

अर्ज कसा करायचा-

उमेदवार त्यांचे ऑफलाइन अर्ज शैक्षणिक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, डिप्लोमा/तांत्रिक/आयटीआय प्रमाणपत्राच्या संलग्न प्रतीसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात.

पत्ता:- डायरेक्टरेट जनरल आसाम रायफल्स, लॅटकोर, शिलॉन्ग, मेघालय - 793010

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com