esakal | करिअर नियोजनातील चार महत्त्वाचे टप्पे माहितीये का?
sakal

बोलून बातमी शोधा

Career

करिअर नियोजनातील चार महत्त्वाचे टप्पे माहितीये का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

करिअर प्लानिंग करताना असंख्य प्रश्न समोर उभी असतात पण त्यासोबतच पालक व विद्यार्थ्यांमध्ये मतभेदही होतात. आपल्या आकांक्षा आणि स्वप्नांना जोडण्यात करिअर प्लानिंग महत्त्वाचे ठरते. पण पालकांची स्वप्ने आणि मुलांच्या आकांक्षा आमनेसामने येतात. यात एकतर पालक- मुलांमध्ये खटके उडू शकतात किंवा एक उत्तम संगम तयार होऊ शकतो.

करिअर अँड पाथ्स, "my.careerandpaths.com" येथे करिअर नियोजनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. यात पालकांची स्वप्ने आणि GenZ च्या आकांक्षा याचा मध्यमार्ग काढला जातो. GenX च्या अनुभवांच्या सामर्थ्यावर GenZ ची स्वप्ने साकार कशी करता येऊ शकतात. या प्रणालीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

तुम्ही तुमच्या करिअरचे नियोजन कसे सुरू करता?

"बेसिक ऑफ करिअर प्लानिंग" वरील कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या विषयावर संशोधन केले व संभाव्य पद्धतीबद्दल अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. एकंदरीत सर्व बाजू पाहिल्यावर असे लक्षात येते कि ही चार टप्प्यांमधील प्रक्रिया आहे.

1. स्वत: चे मूल्यांकन करणे

2. करिअरमधील संभाव्य पर्यायांचा शोध घेणे

3. आपल्या ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेणे आणि कृती योजना तयार करणे

4. प्रारंभिक टप्प्यात तयारी करणे आणि प्रारंभिक टप्प्यातील चाचणी करणे

हेही वाचा: विशेष : नोकरी-धंदा म्हणजे करिअर नव्हे!

स्वत: चे मूल्यांकन

स्वत: चे मूल्यांकन न करता एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेणे म्हणजे आपले सामर्थ्य जाणून घेतल्याशिवाय एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. एखाद्या कसलेल्या जलतरणपटूने धावण्याच्या शर्यतीत भाग घेणे कितपत चांगले आहे?

जर तुम्हाला स्वतः बद्दलचीच माहिती नसेल तर करिअरचा कोणता मार्ग सर्वात जास्त समाधानकारक असेल, हे आपल्याला कसे कळू शकेल? हे कळणे अशक्यच आहे. म्हणूनच स्वत: चे मूल्यांकन करणे हा करिअर नियोजन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या टाकळकर यांनी Multiple Intelligence आणि करिअर याबाबत भाष्य केले. ते सांगतात,स्वत:च्या एकाधिक- बुद्धिमत्तांचे मूल्यांकन विविध पद्धतींनी केले जाऊ शकते. मूल्यमापन चाचणी आपल्या अधिग्रहित ("Aquired") बुद्धिमत्तेचे मूल्यांकन दाखवते, तर DMIT सारखी तंत्रे आपली जन्मजात ("Innate") बुद्धिमत्तेचे मूल्यांकन दाखवण्याचा प्रयत्न करते. दोन्ही तंत्र अधिग्रहित किंवा जन्मजात बुद्धिमत्तेचे मूल्यांकन दाखवतात.

जशा आपल्या सामर्थ्यशाली बुद्धिमत्तेचा जास्ती-जास्त वापर करणे ही सर्वात नैसर्गिक गोष्ट आहे, त्याचप्रमाणे हा आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा सर्वात कमी तणावपूर्ण मार्ग आहे. त्यामुळे करिअर प्लानिंग करताना आपल्या सामर्थ्यशाली बुद्धिमत्तेचा शोध तुम्ही घ्यायला हवा.

हेही वाचा: संधी करिअरच्या... : बारावीनंतर... फॉरेन्सिक सायन्समधील करिअर

संभाव्य करिअर पर्यायांचा शोध

तुमच्या निर्णयाची अचूकता ही तुम्ही मूल्यांकन केलेल्या माहितीवर आधारित आहे . तुम्ही जितके कमी शोध घ्याल तितके कमी पर्याय तुम्हाला मिळतील. तुम्ही जास्ती-जास्त मार्ग शोधण्यासाठी जेवढी वेळेची गुंतवणूक कराल तेवढेच जास्त पर्याय तुम्हाला मिळतील.

योग्य कार्यक्षेत्र शोधणे खूप महत्त्वाचे आहे. करिअर कार्यक्रम देणाऱ्या संस्थांबरोबर, त्या करिअर क्षेत्रातील निष्पक्ष मार्गदर्शकांबरोबर आणि माजी विद्यार्थ्यांबरोबर संपर्क साधणे हे ही अत्यंत महत्वाचे आहे. मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या करिअर निवडीचे वास्तववादी मूल्यमापन प्रदान करू शकतात आणि विशिष्ट क्षेत्रात काय करावे आणि काय करू नये याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करु शकतात.

कार्यक्षेत्र निवडणे व योग्य सल्लागार शोधणे ही गोष्टी इतकी सोपी नसते. शिक्षण संस्थेची वेब साईट, "शिक्षा" सारख्या वेब साईट्स किंवा "करिअर अँड पाथ्स" सारखी नियोजन साधने वापरल्यास हे कमी त्रासदायक होऊ शकते.

आपल्या ध्येयासाठी मार्गांचे संशोधन व त्याबद्दलची कृती योजना

एकदा तुम्ही करिअरमधील ध्येय ठरवल्यावर या ध्येयाकडे जाण्याचे व जे आपल्या परिस्थितीसाठी सर्वात योग्य आहे, असे मार्ग निश्चित करणे महत्त्वाचे असते. उदा. बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग फक्त १२ वी आणि सीईटी आणि जेईई हाच नसून, त्याच ध्येयाकडे १०वी अधिक डिप्लोमा या मार्गानेही जाता येते. इच्छित स्थळी नेणारे असे वेगवेगळे मार्ग शोधणे हे एक महाकठीण काम ठरू शकते. "करिअर आणि पाथ्स" सारखी साधने यात उपयुक्त ठरतात.

डॉक्टर देवयानी कट्टी या एक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर सल्लागार आहेत. त्यांनी, करिअर प्लानिंगमध्ये ध्येय निश्चित करण्याचा पैलू किती महत्त्वाचा आहे हे सांगितले. आपण आपल्या ध्येयाकडे कशी प्रगती करणार आहोत त्यासाठी योजना बनवणे आणि त्या योजनेचा नियमित पाठपुरावा करणे हे खूप महत्त्वाचे असते. तुमची सर्वात आवडती योजना काही कारणास्तव कार्य करत नसल्यास येथे पर्यायी योजना असणे देखील महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: ‘अ’ ऑनलाइनचा : शिक्षण ‘हायब्रीड’ व्हावे...

आपल्या ध्येयांचे मार्ग शोधणे

जेव्हा आपण करिअरच्या मार्गांबद्दल चर्चा करतो, तेव्हा आपण अनेक प्रकारच्या कोर्सेसची माहिती घेतो. त्यासाठी प्रवेश चाचण्यांचा विचार करत असतो. कुठल्याही संस्थेत काही कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आवश्यक असतात. बऱ्याच संस्था, विशेषतः "Deemed" विद्यापीठे यांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा देखील घेतात. या प्रवेश परीक्षांबाबतची माहिती संबंधित संस्थेच्या वेबसाईटवर, "शिक्षा" सारख्या वेबसाईटवर किंवा "करिअर आणि पाथ्स" याठिकाणी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त कार्यक्रमांसाठी संधी उपलब्ध करणाऱ्या कमीत कमी प्रवेश परीक्षा शोधणे हे खूप महत्वाचे आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात तयारी करणे आणि चाचणी करणे

तुमच्या मुलाचे वय आठ वर्षांपेक्षा जास्त असल्यास आपण विविध वयोगटांसाठी उपलब्ध असलेल्या स्पर्धा परीक्षांचा लाभ घेऊ शकता. विज्ञानाकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना शमा जोशी या मार्गदर्शन करतात. त्याच बरोबर त्या होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षांची तयारी या "Inquisitive Minds" संस्थे मार्फत करवून घेतात. या स्पर्धा परीक्षांचा वापर, पदके मिळवण्याच्या शर्यतीसाठी नव्हे, तर तुम्हाला खरोखर विषय आवडतो का याचे मूल्यांकन करण्यासाठी केला, तर, तो जास्त उपयुक्त ठरू शकेल. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा किंवा विविध ऑलिम्पियाडसारख्या परीक्षांना उपस्थित राहून तुम्हाला शिकण्याच्या कोणती क्षेत्रे खरोखर आनंद देतात ह्याचे मूल्यमापन करण्यात होऊ शकते, अशी क्षेत्रे ही तुमचे अंतिम ध्येय असू शकतात.

ऍरिस्टोटल म्हणाला होता कि “Well begun is half done”. करिअर प्लानिंगची प्रक्रिया ही करिअरसाठी निवडलेल्या मार्गावरील प्रवासा इतकीच महत्त्वाची आहे. हा प्रवास कसा सुरू करायचा हे सर्वांना समजण्यास मदत करण्यासाठी, “करिअर आणि पाथ्स” 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:00 वाजता एक कार्यक्रम आयोजित करत आहे, जिथे डॉ. कट्टी, टाकळकर आणि शमा जोशी हे तज्ज्ञ करिअर प्लानिंगबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

“करिअर आणि पाथ्स” च्या my.careerandpaths.com या संकेतस्थळावर पूर्व नोंदणी करून या चर्चेत सहभागी व्हा आणि आपल्या करिअरच्या प्रवासाला सुरुवात करा.

Link To register

loading image
go to top