esakal | BECIL : नोकरीसाठी जाहीर करण्यात आलेली Notification अखेर रद्द!
sakal

बोलून बातमी शोधा

BECIL Notification

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडने 6 जुलै रोजी प्रसिध्द केलेली नोकरीसंदर्भातील नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.

BECIL : नोकरीसाठी जाहीर करण्यात आलेली Notification अखेर रद्द!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडने (Broadcast Engineering Consultants India Limited) 6 जुलै रोजी प्रसिध्द केलेली नोकरीसंदर्भातील नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. 'जाहिरात क्रमांक BECIL/HR/AAICLAS/Advt.2021/65 च्या आधारे 5 जुलै 2021 अंतर्गत ही रिक्त पदे रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, बीईसीआयएलने माघार घेत असल्याची माहिती उमेदवारांना देखील कळविली आहे. बीईसीआयएलने 6 जुलै रोजी एएआय कार्गो लॉजिस्टिक अॅण्ड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited), सूरत येथे एका कराराच्या आधारे भरतीसाठी अर्ज मागवले होते. यात अप्रेंटिस, लोडर आणि सुपरवायझर या पदांसाठी एकूण 37 पदे जाहीर केली होती. (BECIL Notification Issued For The Government Job On July 6 Canceled Here Are The Complete Details)

या नोकरीच्या नोटिसीसह बीईसीआयएलने नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानमधील विविध कंत्राटी पदांसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खुली असून अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 30 जुलै आहे.

हेही वाचा: 'JEE Main'च्या तिसर्‍या सत्रासाठी 15 जुलैला जाहीर होणार Admit Card!

दरम्यान, बीईसीआयएलने मुंबई आणि गोवा येथील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) प्रादेशिक कार्यालये कराराच्या आधारावर सोशल मीडिया कार्यकारी भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. हे अर्ज बीईसीआयएलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. अनुसूचित जाती, एसटी, ईडब्ल्यूएस आणि पीएच वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 450 रुपये, तर इतरांसाठी अर्ज फी 750 रुपये आहे.

BECIL Notification Issued For The Government Job On July 6 Canceled Here Are The Complete Details

loading image