लाईव्ह न्यूज

बायोमॅन्युफॅक्चरिंग : बायोटेक्नॉलॉजीतील ग्रीन ग्रोथ संशोधन

भविष्यातील जैव-आधारित उत्पादनावर जैवतंत्रज्ञानाचा जोरदार प्रभाव पडेल.
Biomanufacturing Green Growth Innovations in Biotechnology
Biomanufacturing Green Growth Innovations in Biotechnologysakal
Updated on: 

- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक

भविष्यातील जैव-आधारित उत्पादनावर जैवतंत्रज्ञानाचा जोरदार प्रभाव पडेल हे लक्षात घेता अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फिनलंड आणि युरोपीय देशांसारख्या अनेक राष्ट्रांनी जैव-उत्पादनासाठी एक मजबूत चौकट तयार करण्यासाठी त्यांची धोरणे, रणनीती आणि रोडमॅप मांडले आहेत.

सर्व प्रमुख देश उच्च-कार्यक्षमता असलेल्या जैव-उत्पादनाला चालना देण्यासाठी संशोधन आणि विकास गुंतवणूक, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, बायोफाउंड्री आणि पूर्व-व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. बायोमॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उद्योग, संशोधन संस्था आणि सरकार यांच्यातील सहकार्य आणि भागीदारी सामान्य आहे.

जैवउत्पादन म्हणजे अक्षय संसाधनांपासून इंधन, रसायने, न्यूट्रास्युटिकल्स, फार्मास्युटिकल्स किंवा इतर मूल्यवर्धित उत्पादने बनवण्यासाठी एंझाईम, सूक्ष्मजीव किंवा अधिक प्रगत जैविक पेशी असलेल्या जैविक प्रणालीचा वापर करणे.

उच्च-कार्यक्षमता जैव उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘ग्रीन ग्रोथ’ एक एकात्मिक बायो ई-३ (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैव तंत्रज्ञान) धोरण हे हरित, स्वच्छ, समृद्ध आणि स्वावलंबी भारतासाठी प्रस्तावित आहे. हे धोरण भारतीय संस्था, विद्यापीठे, स्टार्टअप्स आणि उद्योगांना परिवर्तनात्मक नवोपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी एक रचना प्रदान करते.

यासाठी खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. -

  • हवामान बदल कमी करणे आणि कार्बनीकरण कमी करणे यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संशोधन आणि नवोपक्रम तीव्र करणे.

  • विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि उत्पादन यांच्यात समन्वय साधून देशांतर्गत जैवउत्पादन क्षमता वाढवणे.

  • कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) एकात्मिक वापर आणि ‘ओमिक्स’ आणि अपस्ट्रीम जैवतंत्रज्ञान नवोपक्रमांसह डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देऊन जैवउत्पादनाकडे संक्रमणाला गती देणे.

  • उच्च-कार्यक्षमता असलेल्या जैवउत्पादनाला चालना देण्यासाठी संसाधने आणि पायाभूत सुविधांसह स्केलिंग-अप आणि प्री-कमर्शिअल उत्पादनासाठी सुविधा (बायोमॅन्युफॅक्चरिंग हब्स/बायोफाउंड्री/बायो-एआय) स्थापन करणे.

  • अत्यंत कुशल कामगारांच्या गटाचे संगोपन करणे.

हे धोरण भारताला समावेशकतेसह शाश्वत संसाधन व्यवस्थापनासह जैव आर्थिक वाढीची पूर्ण क्षमता साकार करण्यास मदत करेल.

व्यापक अर्थाने, बायोसायन्स उद्योग हे वेगाने वाढणारे क्षेत्र असून संशोधनाच्या संधी देते. तुमच्याकडे पात्रता असल्यास बायोसायन्स उद्योगाद्वारे दिल्या जाणाऱ्या अनोख्या संधी आणि फायद्यांचा आनंद घेण्यासाठी चांगल्या स्थितीत असाल, तुम्ही नवीन उत्पादन विकसित करणाऱ्या छोट्या स्टार्ट-अपसाठी काम करत असाल.

मोठ्या बायोप्रोसेस किंवा फार्मास्युटिकल उत्पादकासाठी काम करत असाल किंवा क्लिनिकल संशोधन क्रियाकलापांचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करणारी आंतरराष्ट्रीय क्लिनिकल संशोधन संस्थेत असाल, तुम्ही एका वाढत्या आणि भरभराटीच्या उद्योगाचा भाग आहे असे समजा. कारण हा एक असा उद्योग आहे जिथे कुशल, सक्षम कर्मचाऱ्यांना महत्त्व दिले जाते आणि त्यांना सद्यःस्थितीला मागणी आहे.

जैवतंत्रज्ञान संशोधन किंवा उत्पादन क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र यासारख्या जीवशास्त्र किंवा जैविक विषयांमधील पदवी, रसायनशास्त्रात किंवा रासायनिक किंवा जैवरासायनिक किंवा बायोप्रोसेस अभियांत्रिकी मधील शिक्षणाद्वारे चांगली सुरुवात करू शकतात. उच्चस्तरीय संशोधन पदांसाठी एम.एस. किंवा पीएच.डी. आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com