6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

Google Meet Layoff Shock: 6:30 वाजता कर्मचाऱ्यांना WFH करण्यास सांगितल्यानंतर रात्री 9:30 वाजता अचानक Google Meetची लिंक पाठवण्यात आली. अवघ्या 5 मिनिटांच्या या कॉलमध्ये 80 भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली नेमकं काय घडलं?
Google Meet Layoff Shock

80 Indian Employees Reportedly Fired in 5-Minute Google Meet Call

eSakal

Updated on

US fintech company Bluevine layoffs: अमेरिकेतील फिनटेक कंपनी Bluevine ने भारतीय कस्टमर सर्व्हिस टीममधील सुमारे 80 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अचानक नोकरीवरून काढल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना आधी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आलं आणि त्यानंतर रात्री अवघ्या पाच मिनिटांच्या Google Meet कॉलमध्ये संपूर्ण टीमला नोकरीवरून कमी केल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती त्यातील एका प्रभावित कर्मचाऱ्याने Reddit वर पोस्ट करत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com