BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

BMC Apprentice Recruitment 2026: ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बीएमसीमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीचा मार्ग मोकळा; दरमहा १७ हजार ते १९ हजार रुपयांपर्यंत मिळणार विद्यावेतन...
Mumbai BMC Announces 612 Apprentice Job Openings for ITI Pass Candidates

Mumbai BMC Announces 612 Apprentice Job Openings for ITI Pass Candidates

esakal 

Updated on

ITI Jobs in Mumbai: आयटीआय (ITI) पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विविध तांत्रिक विभागांमध्ये तब्बल ६१२ शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) एका वर्षाच्या करारावर भरती केली जाणार आहे. या भरतीमुळे तरुणांना पालिकेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्लंबर, वायरमन, फिटर आणि सुतार यांसारख्या महत्त्वाच्या तांत्रिक पदांवर नवीन भरती झाली नव्हती. त्यामुळे पालिकेची अनेक कामे रखडली होती. अखेर ११ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर व्यवसाय आणि प्रशिक्षण संस्थेच्या सर्वेक्षणानुसार या ६१२ पदांवर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com