Border Roads Organisation : कुशल कामगारांना ५५ हजारांहून अधिक पगार

या भरतीद्वारे एकूण १ हजार १७८ पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांची माहिती खाली दिली आहे.
BRO recruitment
BRO recruitmentgoogle

मुंबई : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने मल्टी स्किल्ड वर्कर (BRO Recruitment 2022) च्या पदांवरील भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यापूर्वी, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून होती आणि आता ती २२ जुलै २०२२ पर्यंत वाढवली आहे.

BRO recruitment
भारतात २०२३ सालापर्यंत स्टार्टअप मधून तब्बल ५० हजार नोकऱ्या जाणार

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.bro.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्जदारांनी नोंद घ्यावी की मल्टी स्किल्ड वर्करच्या पदांवर भरतीद्वारे मेसन / नर्सिंग असिस्टंटच्या अर्जाची अंतिम तारीख २२ जुलै आहे तर, स्टोअर कीपर टेक्निकल आणि ड्रायव्हर इंजिनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जुलै २०२२ आहे. या भरतीद्वारे एकूण १ हजार १७८ पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांची माहिती खाली दिली आहे.

BRO भरती २०२२ रिक्त जागांचा तपशील

वय मर्यादा

मेसन- मल्टी स्किल्ड वर्कर मेसनच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असणे आवश्यक आहे.

नर्सिंग असिस्टंट, स्टोअर कीपर टेक्निकल, ड्रायव्हर इंजिन - या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे.

BRO recruitment
स्वामी विवेकानंद तपस्वी जीवनाकडे कसे आकर्षित झाले होते ?

निवड प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज करणार्‍या सर्व उमेदवारांना लेखी चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, प्रात्यक्षिक, व्यापार चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उपस्थित राहावे लागेल.

पगार

या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये पगार मिळेल.

अर्ज फी

सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतील. यासोबतच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.

दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा

सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर कमांडंट, GREF CENTRE, Dighi Camp, Pune- 411015 येथे पाठवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com