data entry operator पदासाठी भरती...अर्ज करण्यासाठी दहाच दिवस शिल्लक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BESIL

data entry operator पदासाठी भरती...अर्ज करण्यासाठी दहाच दिवस शिल्लक

मुंबई : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL)ने data entry operator पदांसाठी अर्ज मागवले आहेत. www.becil.com या पदांवर २२ मेपर्यंत अर्ज करता येईल.

हेही वाचा: भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू

अर्ज कसा करावा ?

संकेतस्थळावर जाऊन करिअर सेक्शनवर क्लिक करावे. त्यानंतर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून नोंदणी करावी. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज शुल्क भरावे. स्कॅन केलेली कागदपत्रे अर्जाच्या शेवटी दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवावीत. अर्ज सबमिट करावा. याद्वारे डेटा एन्ट्री ऑपरेटरची ८६ पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा: India post payment bankमध्ये ६५० पदांवर भरती

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे.

टंकलेखनाचा वेग

इंग्रजी टंकलेखनाचा वेग ३५ शब्द प्रतिमिनिट आणि हिंदीचा वेग ३० शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: ONGCमध्ये काम करण्याची मोठी संधी..... असा करा अर्ज

अर्ज शुल्क

खुला वर्ग, इतर मागसवर्गीय आणि महिला उमेदवारांसाठी ७५० रुपये अर्ज शुल्क आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी ४५० रुपये अर्ज शुल्क आहे.

Web Title: Engineering Consultant India Limited Data Entry Operator Recruitment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Recruitment
go to top