BSF Recruitment 2023 : परिक्षेशिवाय भरती होण्याची सुवर्णं संधी, एक लाखापेक्षा जास्त मिळेल पगार

सीमा सुरक्षा दलात असिस्टंट कमांडेट बनण्याचं स्वप्न आता पुर्ण होऊ शकेल. बऱ्याच पदांवर जागा भरती होणार.
BSF Recruitment 2023
BSF Recruitment 2023esakal

Government Job In BSF : सीमा सुरक्षा दलाने वेटरनरी असिस्टंट सर्जन (असिस्टंट कमांडेंट) ग्रुप A पदांवर जागा भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. साधारण २० पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून ९ जानेवारीच्या आधी अर्ज करणे आवश्यक आहे.

महत्वाची माहिती

अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ९ जानेवारी २०२३

एकूण जागा - २०

वयोमर्यादा - २३ ते ३० वर्षा दरम्यान वय असावे. सरकारी नियमांनुसार यात काही सुट दिली जाऊ शकते.

BSF Recruitment 2023
Govt Jobs : 12वी पास तरूणांकरिता 4500 सरकारी नोकऱ्या! कसा-कुठे कराल अर्ज? वाचा सविस्तर

आवश्यक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयात पदवीधर पदवी किंवा भारतीय पशुवैद्यकीय परिषदेत नोंदणीसह समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

BSF Recruitment 2023
Govt Jobs in Maharashtra: मोठी बातमी! राज्यात मेगा भरतीची घोषणा; भरली जाणार ७५ हजार पदे

वेतन - वेटरनरी असिस्टंट सर्जन (असिस्टंट कमांडेंट) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ५६,१०० रुपयांपासून ते १ लाख ७७ हजार ५०० रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.

या विषयीची अधिक माहिती BSF ची अधिकृत वेबसाइट bsf.gov.in यावर मिळू शकेल. या शिवाय इच्छुकांना https://rectt.bsf.gov.in/ या लिंकवरही सविस्तर माहिती मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com