BYJU'S घेणार 'आकाश एज्यूकेशन'चा ताबा; 7,300 कोटींची होणार डील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

Byju's चे उत्पन्न वाढून आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये ते 2,800 कोटी झाले होते

नवी दिल्ली : ऑनलाईन एज्यूकेशन सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या Byju's ने आता या सेक्टरमधील प्रमुख कंपनी आकाश एज्यूकेशनल सर्व्हिसेसला आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा करार जवळपास एक अब्ज डॉलर म्हणजेच 7,300 कोटी रुपयांना होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही डील पूर्ण होण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा वेळ जाऊ शकतो. Byju's ने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ग्लोबल टेक्नोलॉजी इन्व्हेस्टमेंट कंपनी सिल्व्हर लेककडून जवळपास 3,689 कोटी रुपये जमा केले होते. तेंव्हा Byju's ची मार्केट व्ह्यॅल्यू 10.8 अरब डॉलर म्हणजेच 80 हजार कोटी झाली होती.

हेही वाचा - MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत

कोरोना संकटाच्या काळात लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. अशा काळात ऑनलाईन शिक्षणासाठी Byju's ने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना जोडून घेतले. तर कोरोना संकटामुळे आकाश एज्यूकेशनल सर्व्हिसेसचे कामकाजावर परिणाम होऊन फटका बसला होता. स्कूल बोर्ड तसेच मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी आकाश एज्यूकेशनचं नाव मोठं आहे. तर एजूकेट कंपनीच्या गुंतवणुकीमध्ये जनरल अटलांटिक, टायगर ग्लोबल आणि आउल व्हेंचर्स समाविष्ट आहेत.

Byju's चे उत्पन्न वाढून आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये ते 2,800 कोटी झाले होते. जेंव्हा कोरोनाचे संकट तीव्र होते तेंव्हा सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीच्या सांगण्यानुसार, Byju's ऍपसोबत 6.4 कोटीहून अधिक विद्यार्थी जोडलेले होते. तर या ऍपच्या पेड सबस्क्रायबरची संख्या 42 लाख आहे.  अलिकडच्या काही वर्षांचे उदाहरण घेतले तर जगभरात ऑनलाईन शिक्षणाचा विस्तार गतीने झाला आहे. भारतात देखील ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याबाबत असा अनुमान लावला जात आहे की, पुढच्या वर्षापर्यंत हे क्षेत्र वाढून 3.5 अरब डॉलर इतक्या मूल्याचे  होईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BYJU'S to acquire Aakash Educational Services for Rs 7,300 crore