लवकरच सीए अभ्यासक्रमात बदल : सीए जंबूसरिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लवकरच सीए अभ्यासक्रमात बदल : सीए जंबूसरिया

लवकरच सीए अभ्यासक्रमात बदल : सीए जंबूसरिया

पिंपरी: ‘‘आयसीएआयकडून लवकरच सीए अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. बदलला अभ्यासक्रम हा ‘ॲप्लिकेशन्स बेस्ड व के स्टडीज’ वर आधारित असेल. बदलत्या तांत्रिक बदलाचे भान ठेवून सीएच्या विद्यार्थ्यांना अपग्रेड करणारा अभ्यासक्रम असेल.’’ अशी माहिती दि इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीहार जंबूसरिया यांनी दिली.

हेही वाचा: अनारक्षित पँसेजर गाड्या उद्यापासून रूळावर! प्रवाशांना दिलासा

निगडी येथे दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी- चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष व कॉमर्सच्या ६० सीए व्याख्यात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, वेस्टर्न रीजनचे अध्यक्ष सीए मनीष गादिया, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्ष चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष विजयकुमार बामणे, खजिनदार शैलेश बोरे, कार्यकारी सदस्य संतोष संचेती, सिमरन लीलवाणी, पंकज पाटणी, सचिन बंसल आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 'शाहरुख माझं काहीही वाकडं करु शकणार नाही'; गोखले

यावेळी पिंपरी-चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष चंद्रकुमार छाब्रा, सुनील कारभारी, बबन डांगले, सुहास गार्डी, आमोद भाटे यांच्यासह ६० कॉमर्सच्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या विकासामध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे ४० टक्के योगदान आहे. कोरोना महामारीमध्ये हे उद्योग डबघाईला आले. अशा स्थितीत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने(आयसीएआय) स्टार्ट अप समिती स्थापन करून उद्योजकांना दिलासा देण्याचे कार्य केले. अध्यक्ष चंद्रकांत काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिमा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. विजयकुमार बामणे यांनी आभार मानले.

loading image
go to top