'शाहरुख माझं काहीही वाकडं करु शकणार नाही'; गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शाहरुख माझं काहीही वाकडं करु शकणार नाही'; गोखले
'शाहरुख माझं काहीही वाकडं करु शकणार नाही'; गोखले

'शाहरुख माझं काहीही वाकडं करु शकणार नाही'; गोखले

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांच्यावर प्रसिद्ध मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी टीका केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सध्या सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गोखले यांनी जी काही विधानं केली त्यापैकी एक विधान हे शाहरुख आणि आर्यन खान संबंधी होते. त्याची चर्चा सुरु झाली आहे. साधारण दोन आठवड्यांपूर्वी आर्यन खानच्या प्रकरणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्या आर्यन खानला एनसीबीनं अटकही केली होती. आता तो सध्या जामीनावर बाहेर आहे.

गोखले यांनी केवळ आर्यन खानच नाही तर महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवरही कडाडून टीका केली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे सोशल मीडियातून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. त्यांनी शाहरुख आणि आर्यनच्या बाबत भाष्य केले आहे की, शाहरुख आणि आर्यन हे दोघेही माझे काहीही वाकडे करु शकत नाही. काहींनी आर्यन खानला हिरो समजलं. मात्र त्याच्यापेक्षा देशाच्या बॉर्डर वर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. अशावेळी आर्यन हिरो नाही. अशा शब्दांत गोखले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कंगनाचीही बाजू घेत अनेकांना धक्का दिला आहे. कंगनानं देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक आहे. तर आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं. असं कंगनानं म्हटलं आहे. त्यावर गोखले यांनी कंगनाची बाजू घेतली आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

कंगनाविषयी बोलताना गोखले म्हणाले होते की, कंगना जे काही बोलली ते बरोबरच आहे. मी तिच्या बोलण्याचे समर्थनच करतो. आपल्या काही नेत्यांमुळे ज्यांना स्वातंत्र्यासाठी मरावं लागलं त्यांच्याविषयी काय असा प्रश्न गोखले यांनी उपस्थित केला. यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणाविषयक आपली भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले येत्या काळात राज्याच्य़ा कल्याणासाठी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यायला हवं. ते जास्त महत्वाचं आहे. गोखले यांची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

हेही वाचा: ..त्यापेक्षा विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा- पृथ्वीराज चव्हाण

loading image
go to top