esakal | CBSE Board Exam 2022: दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा लवकरच होणार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

cbse board exam timetable download pdf

CBSE Exam : दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा लवकरच होणार जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : CBSE Board Exam 2022: सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. यामध्ये टर्म वनची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थी सध्या या परीक्षांच्या डेटशीटची वाट पाहत आहेत. परंतू लवकरच त्याची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण येत्या १८ ऑक्टोबर रोजी याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: COVID19 | राज्यात दिवसभरात २,३८४ रुग्णांची नोंद

सन २०२१च्या बोर्डाच्या परीक्षा कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आली होती. तसेच विशेष परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं. बोर्डाने यावेळी परीक्षा दोन भागात म्हणजेच टर्म -१ आणि टर्म -२ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक सत्रात ५० टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. टर्म - १ ची डेटाशीट, विद्यार्थ्यांची यादी, परीक्षा केंद्र आणि इतर महत्वाच्या गोष्टींवरही काम सुरु झालं आहे.

हेही वाचा: Photo: बस्स! प्रियांकाला फक्त पहातच राहावं...

दरम्यान, सीबीएसईच्या टर्म- १ च्या परीक्षेचं शेड्युल, तारखा आणि वेळापत्रक ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोविड-१९ नियमावली देखील जाहीर केली आहे. सीबीएसईकडून आपल्या वेबसाईटवर cbse.gov.in टर्मची डेटाशीट जाहीर करणार आहे. सीबीएसईची बोर्डाची परीक्षा २०२२ च्या सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी ताज्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईट तापसणी करावी.

टर्म -१ परीक्षेचं स्वरुप कसं असेल?

  • परीक्षेचा पेपर हा बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह स्वरुपात असेल

  • दोन्ही टर्मच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत.

  • बहुपर्यायी प्रश्न केस-आधारित होणार आहेत.

  • विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.

  • विद्यार्थ्यांना परीक्षांदरम्यान रिव्हिजन करण्याला भरपूर वेळ मिळेल. या परीक्षा ४-८ आठवड्यात आयोजित करण्यात येईल.

टर्म -२ परीक्षेचं स्वरुप कसं असेल?

  • टर्म -२ परीक्षेत सविस्तर प्रश्न असतील.

  • परीक्षेत दीर्घ आणि लघू दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील

  • परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल

loading image
go to top