esakal | CET Exam : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांना सुरूवात; उद्यापासून एमबीए सीईटी
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

CET Exam : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांना सुरवात

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी सीईटी (CET exam) परीक्षा घेतली जाते आहे. या परीक्षांना आजपासून (ता.१५) पासून सुरवात झाली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. उद्या (ता.१६) पासून एमबीए (MBA) शिक्षणक्रमाच्‍या सीईटी (CET) परीक्षेला सुरवात होते आहे.

व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांना सुरवात

परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी संख्येप्रमाणे सीईटीच्‍या वेळापत्रकाचे नियोजन केले आहे. त्‍यानुसार कमी विद्यार्थी संख्या असलेल्‍या परीक्षांकरीता एक दिवसाचा कालावधी असून, जास्‍त विद्यार्थी संख्या असलेल्या शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे नियोजन एकापेक्षा जास्‍त सत्रात व एकाहून अधिक दिवस करण्यात आले आहे. बुधवारी (ता.१५) पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम एमसीए, तसेच हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी, आर्किटेक्‍चर, शारीरीक शिक्षण या विषयांची सीईटी परीक्षा नियोजित होती. उद्या (ता.१६) पासून शनिवार (ता.१८) पर्यंत एमबीए शिक्षणक्रमाची सीईटी परीक्षा राज्‍यभरात होणार आहे. विधी अभ्यासक्रमांच्‍या पाच व तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमाकरीताची सीईटी परीक्षा ऑक्‍टोबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात होणार आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षेला सोमवारपासून सुरवात

अभियांत्रिकी (बी.ई.), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्म.), आणि कृषी अभ्यासक्रम (बी.एस्सी-कृषी) यांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला येत्‍या सोमवार (ता.२०) पासुन सुरवात होणार असून, ही परीक्षा १ ऑक्‍टोबरपर्यंत चालणार आहे. पहिल्‍या टप्‍यात भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची परीक्षा घेतली जाणार असून, संकेतस्‍थळावर प्रवेशपत्रदेखील उपलब्‍ध झालेले आहे.

हेही वाचा: 10 वी, 12 वीसह ITI विद्यार्थ्यांना आसाम रायफल्समध्ये संधी

निकाल प्रक्रियेला हवी गती

सीईटी परीक्षांना सुरवात झाली असून, आगामी काळात लवकरात लवकर या परीक्षांचा निकाल जाहीर करावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्‍यक्‍त होते आहे. तसेच निकाल जाहीर झाल्‍यानंतर लगेचच प्रत्‍यक्ष प्रवेश परीक्षेकरीताचे कॅप राउंड प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर व्‍हावे, असेही विद्यार्थ्यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत फॅकल्टी पदांची भरती!

loading image
go to top