esakal | CET Exam ची अनिश्चितता; 11 वी प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम
sakal

बोलून बातमी शोधा

CET Exam ची अनिश्चितता; 11 वी प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम

CET Exam ची अनिश्चितता; 11 वी प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (सीईटी) ची (CET) तारीख अजूनही निश्चित नाही. परीक्षा बोर्डाने (Board exam) घ्यायची की महाराष्ट्र (maharashtra) परीक्षा परीषदेने घ्यायची याबाबत अद्याप काहीच निश्चित नाही. त्यामुळे दहावीचा निकाल लागला असला तरी अकरावी प्रवेश प्रक्रियेचे घोंगडे तसेच भिजत पडले आहे.

कोरोनाच्या (covid -19) प्रार्दुभावामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. ९ वी चे ५० टक्के गुण आणि १०वी चे अंतर्गत मुल्यमापन या आधारे १० वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यात आले. त्यानुसार आज १० वीचा निकाल लागला. पुढील आठ दिवसात विद्यार्थ्यांच्या हातात त्यांचे गुणपत्रक मिळेल. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचे काय? हा प्रश्न कायम आहे. कारण अद्याप राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने अकारावीच्या प्रवेशाबाबत कोणत्याही ठोस निर्णय घेतलेला नाही.

हेही वाचा: शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

अकरावी (11 th standard) प्रवेशासाठी सीईटी परीक्षा असणार आहे. मात्र ती बंधनकारक नाही. ज्यांना सीईटी द्यायची नाही त्यांचे प्रवेश दहावीच्या मुल्यांकनावर होणार आहेत. अद्याप सीईटी परीक्षा कोणी घ्यायची याचाही निर्णय राज्य शासनाने केलेला नाही. ही परीक्षा बोर्डाने घ्यायची की महाराष्ट्र परीक्षा परीषद सीईटी घेणार हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी जी पूर्व तयारी करावी लागते तीही अजून झालेली नाही. केवळ सीईटी परीक्षा होणार आहे आणि ती बहुपर्यायी स्वरुपाची असेल एवढेच निश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही अकरावी प्रवेशाबाबत संभ्रमात आहेत.

"ज्या वेळी राज्य शासनाकडून निश्चित सूचना येतील त्या प्रमाणे अकरावी प्रवेशाबाबत पुढील कार्यवाही करू. अद्याप शासनाकडून याबाबत कोणतीही सूचना आलेली नाही."

- सुभाष चौगुले (सह शिक्षण संचालक)

हेही वाचा: थ्री टी प्लस व्हॅक्सिन धोरण राज्यभर राबवणार; राजेश टोपेंची माहिती

आकडे सांगतात...

  • शहरातील महाविद्यालये - ३५

  • प्रवेश क्षमता

  • शाखा माध्यम जागा

  • कला इंग्रजी १२०

  • कला मराठी ३६००

  • वाणिज्य इंग्रजी १६००

  • वाणिज्य मराठी ३३६०

  • विज्ञान इंग्रजी ६०००

  • एकूण १४६८०

loading image