NEET विद्यार्थ्यांना बस प्रवासात मिळणार ५०% सूट, राहण्याचीही सोय; मोहर्रमच्या मिरवणुकीसाठी योगी सरकारचे नवे नियम

Uttar Pradesh Government: नीट परीक्षार्थ्यांसाठी यूपी सरकारकडून एसटी बसभाड्यात ५०% सूट, दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय; कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवत मोहर्रम मिरवणुकांसाठी कडक नियम लागू
neet students bus ticket 50% off

neet students bus ticket 50% off

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी काळात राज्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव आणि राष्ट्रीय स्तरावरील 'नीट' (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि विद्यार्थी हितासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

आगामी २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्र्यांनी एसटी बस प्रवासाच्या भाड्यात ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच आगामी मोहर्रम सणाच्या काळात राज्यातील शांतता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश जारी केले आहेत.

मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था, मोहर्रम, नीट परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com