YCMOU
YCMOUSakal

YCMOUच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची 'या' तारखेपर्यंत मुदत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे (YCMOU) शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यापीठाच्या विविध शंभराहून अधिक शिक्षणक्रमांना राज्यभरातील विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेऊ शकतील, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली आहे. (Latest marathi news)

YCMOU
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना DRDOमध्ये नोकरीची संधी

दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचविण्याचे कार्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करत आहे. नोकरी, व्यवसाय, घर, संसार सांभाळून किंवा विविध कारणांनी शिक्षणापासून वंचित राहिलेले घटकातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. स्पर्धा परीक्षांना उपयुक्त, नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमही विद्यापीठातर्फे सुरु केलेले आहेत. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, संगणकशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, निरंतर शिक्षण, आरोग्यविज्ञान, शिक्षणशास्त्र या विद्याशाखांच्या विविध प्रकारच्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

YCMOU
शिक्षकभरतीच्या प्रक्रियेसाठी नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे आवश्यक

प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. कोविड महामारीच्‍या काळातही सुमारे पावणे सहा लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे शाखेत मराठी, उर्दू बीए.सह हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, ग्रंथालय व माहितीशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन विषयात एम.ए. करण्याची संधी उपलब्ध केली आहे. वाणिज्य शाखेत एम.कॉम, एम.बी.ए., बी.कॉम., बीबीए करण्याची संधी आहे. विज्ञान शाखेतही बीएस्सी बरोबरच विविध विषयात एम.एस्सीचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय पाणी व्यवस्थापन, बांधकाम पर्यवेक्षक, सलून, टेलरिंग, छायाचित्रण, व्हिडिओ निर्मिती, पटकथालेखन, सुरक्षारक्षक, ग्रामरोजगार सेवक, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, पालीभाषा, सहकार व्यवस्थापन, पर्यावरण, शालेय व्यवस्थापन, घर कामगार कौशल्य असे विविध कौशल्याधिष्ठीत पदविका, प्रमाणपत्र शिक्षणक्रम विद्यापीठाने उपलब्ध केले आहेत.

YCMOU
CET परीक्षांची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; प्रवेश प्रक्रिया लांबण्याची भीती

संकेतस्‍थळावरुन नोंदणी

यावर्षी प्रवेश घेण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. विद्यापीठातर्फे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. अधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी www.ycmou.ac.in किंवा www.ycmoudigitaluniversity.ac या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com