Education News : 22 नोव्हेंबरपासून कॉलेज पुन्हा सुरू

Delhi University
Delhi Universityesakal
Summary

UG अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

दिल्ली : दिल्ली विद्यापीठानं (Delhi University) मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 रोजी शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी पदवीपूर्व (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांचे (प्रथम वर्ष) शैक्षणिक कॅलेंडर नुकतेच जारी केलेय. पहिल्या सेमिस्टरच्या यूजी कोर्सेसचे क्लासेस 22 नोव्हेंबरपासून आणि पीजी कोर्सेसचे क्लास 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर du.ac.in जाऊन सूचना तपासाव्यात.

UG अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे, तर PG अभ्यासक्रमांचे वर्ग 16 एप्रिलपासून सुरू होतील. पहिल्या सत्रातील UG च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेतली जाईल.

Delhi University
खुशखबर! Emirates मध्ये 6,000 हून अधिक पदांसाठी भरती

दरम्यान, यूजी वर्गातील सम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. तर, पीजी फर्स्ट सेमिस्टरच्या परीक्षा 30 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान होतील. पीजी प्रथम वर्ष सम सेमिस्टर परीक्षा 12 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार असून सम सेमिस्टर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक सत्र 26 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे दिल्ली विद्यापीठाने सांगितलेय.

Delhi University
खुशखबर! यूपी सरकार देणार 22 हजारांहून अधिक सरकारी नोकऱ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com