esakal | भारतीय सैन्यात अधिकारी पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

sainya bharti.jpg

भारतीय सैन्यात अधिकारी पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

लेखी परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही केली जाईल.

सोलापूर : भारतीय लष्कराने (Indian Army) अधिकारी पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार 19 ऑगस्ट 2021 पर्यंत jointerritorialarmy.gov.in या भारतीय टेरिटोरियल आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. (Detailed information on recruitment of officers in Indian Army-ssd73)

हेही वाचा: दोन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!

भारतीय सैन्य अधिकारी भरती 2021 साठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्‍यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे असावे. तथापि, अन्य श्रेणीतील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयाची सवलत देण्यात येणार आहे. लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. भरतीसाठी लेखी परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. केवळ लेखी परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही केली जाईल.

हेही वाचा: अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षा

लेखी परीक्षेचा पॅटर्न

ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात येईल. उमेदवारांना प्रत्येक पेपरसाठी दोन तास दिले जातील. यात उमेदवारांना वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. लेखी चाचणी पास होण्यासाठी उमेदवारांना सर्व विभागात किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे.

सर्व इच्छुक उमेदवार 19 ऑगस्ट 2021 पर्यंत Indian Army Officer Recruitment 2021 साठी अधिकृत संकेतस्थळ jointerritorialarmy.gov.in यावर अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 200 रुपये अर्ज फी भरावी लागेल. भरतीसंबंधित सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना तपासावी.

loading image