Chartered Accountants : सीएच्या अभ्यासक्रमात लवकरच बदल

विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार; केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा
Chartered Accountants
Chartered Accountantssakal

अकोला : चार्टर्ड अकाउंट (सीए) अभ्यासक्रमात लवकरच बदल होणार आहे. या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार असल्याचीमाहिती आयसीएच्या डब्ल्यूआयआरसीचे अध्यक्ष मुर्तुझा काचवाला यांनी अकोला येथे दिली. अकोला येथील आयसीएआयच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला ते संबोधित करीत होते. यावेळी डब्ल्यूआयआरसीचे पियूष चांडक, गौतम लाट, स्वेता जैन, हिरेन जोगी, सीमा बाहेती, नवीन कृपलानी, भूषण जाजू, सुमित आलिमचंदानी, पंकज लकनिया, रमेश चौधरी, मनोज चांडक आदींची उपस्थिती होती. सीएच्या अभ्यासक्रमाचा कालावधी सध्या तीन टप्प्प्यात साडेतीन वर्षांचा आहे. तो अडीच वर्षांवर आणण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक केंद्राकडे प्रलंबित आहे. येत्या डिसेंबरपर्यंत त्याला मान्यता मिळून नवीन अभ्यासक्रम येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होऊ शकेल, असे मुर्तुझा काचवाला यांनी सांगितले. याशिवाय पेपरची संख्याही आठवरून सहावर आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीएमध्येही स्पेशलायझेशन

सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही एका क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येणार आहे. त्यामुळे तो कोणत्याही एकाच क्षेत्रावर भर देवू शकेल. सीएच्या क्षेत्रात अनेक बदल करण्यात येत असून, डेटा अनालिस्टसारख्या गोष्टीवरही भर दिला जात असल्याचे मुर्तुझा काचवाला यांनी सांगितले.

ई-लायबरी

अकोला येथील आयसीएआयच्या ब्रँचमध्ये विद्यार्थ्यांसाठी ई-लायबरी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महागड्या पुस्तकांच्या खर्चापासून सुटका मिळणार असल्याची माहिती मुर्तुझा काचवाला यांनी दिली.

जागतिक परिषदेचे मुंबईत आयोजन

अकाउंडसंदर्भातील जागतिक परिषद मुंबईत पुढील महिन्यात आयोजित केली जाणार आहे. या परिषदेला जगभरातून सहा हजार सीए उपस्थित राहणार आहेत. ही परिषद दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. यापूर्वी ही परिषद सिडनी येथे आयोजित केली होती. भारतातील सीए या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती मुर्तुझा काचवाला, स्वेता जैन यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com