Corona patients
Corona patientssakal media

राज्यात कोरोना रुग्ण पुन्हा वाढण्याची भीती; 75 टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Authorities) रविवारी राज्यातील 10 दिवसांच्या गणेश पूजनानंतर कोरोना विषाणूच्या (corona virus) रुग्णांमध्ये वाढ होण्याबाबतचा (corona patient increases) इशारा दिला आहे, ओणमनंतर केरळमधील रुग्णांमध्ये (keral patient) झपाट्याने वाढ झाल्याचे उदाहरण देत आताच खबरदारी (precautions) घेतली नाही तर रुग्ण वाढून परिस्थिती बिकट बनू शकेल असे मत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (dr pradip Awate) यांनी व्यक्त केले आहे.

Corona patients
परतीच्या हंगामासाठीही एसटी सज्ज; रविवार पर्यंत 1500 बसेस फुल

“ सणांनंतर कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणातून समोर आले आहे, कारण सणांमध्ये लोक गर्दी करतात. नागरिकांनी मास्क घालणे किंवा सामाजिक अंतर राखणे यासारख्या मूलभूत नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर गणेशोत्सवानंतर राज्यात रुग्ण वाढण्यास पुन्हा सुरुवात होईल.

बुद्धी वापरुन सण साजरा करा

"गणेश हा बुद्धीचा देव आहे, आणि आपण सर्वांनी बुद्धी वापरुन सण साजरा करायला हवा.  त्रिसुत्रींचा वापर व्हायलाच हवा. जेणेकरून राज्यातील परिस्थिती नियंत्रणात राहिल."

- डाॅ . प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

सध्या, केरळ नंतर सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या महाराष्ट्रात 50,400 सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून 75.85% एवढ्या सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona patients
मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उदघाटन; राज्यपाल म्हणाले...

आवटे म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांना सल्ला दिला आहे आणि या पाच जिल्ह्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. आवटे म्हणाले, “आम्ही त्यांना चाचणी सुविधा वाढवण्यास सांगितले आहे तसेच रुग्णांना वेगळे केले आहे आणि त्यांची औषधे सुरू केली आहेत याची खात्री केली आहे. महाराष्ट्रात  रविवारी 3, 623 नवीन कोविड -19  रुग्णांची नोंद झाली. या महिन्यात आतापर्यंत सरासरी दैनंदिन चाचण्या 169,020 झाल्या आहेत, ज्या ऑगस्टच्या तुलनेत कमी आहेत, जेव्हा दररोज 193,848 चाचण्या घेतल्या जात होत्या.

राज्यात गेल्या सात दिवसांत चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) 2.67% होता, मात्र, आरोग्य अधिकारी विशेषतः आठ जिल्ह्यांमध्ये जास्त टीपीआरबद्दल चिंतेत आहेत. पुण्यात 6.33% टीपीआर, सांगली (5.59%) आणि अहमदनगर (5.39%) मध्ये 5% पेक्षा जास्त टीपीआर आहे, यातुन हे स्पष्ट होते की कोविड -19 परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत महाराष्ट्रातील 64,97,877 लोक कोविड पाॅझिटिव्ह आले आहेत. राज्यभरातील 50,400 सक्रिय कोविड -19 रुग्णांपैकी 13,018 रुग्णांसह पुणे जिल्ह्यांच्या यादीत अव्वल आहे, त्यानंतर ठाणे 7,979, अहमदनगरमध्ये 6, 027 आणि  साताऱ्यात 5,637 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com