esakal | अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

admission

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी (ता.४) जाहीर करण्यात आली आहे. अकरावीच्या दुसऱ्या यादीनंतर शहरातील बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या २३ हजार प्रवेश अर्ज, दुसऱ्या यादीत बेटरमेंटच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसह प्रवेश यादीत नाव न आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे डोळे आजच्या गुणवत्ता यादीकडे लागले होते. पण त्यांचा अर्ज ‘लॉक’ असल्याने त्यांचे प्रवेश तिसऱ्या फेरीनंतरच निश्‍चित होतील. नामांकित महाविद्यालयातील अकरावीच्या उपलब्ध जागा पाहता तिसऱ्या यादीसाठी जागा शिल्लक राहण्याची शक्यता फारच कमी आहे.

विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेसाठी अकरावी ऑनलाइनची दुसरी गुणवत्ता यादी आज सकाळी १० वाजता जाहीर झाली आहे. या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी ४, ५ व ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मुदत आहे. रिक्त जागांचा तपशील संबंधित संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी तिसरी यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित केला नाही, अशा विद्यार्थ्यांचे पुढील दोन नियमित फेरीसाठी अर्ज लॉक झालेले आहेत. या नाकारलेल्या २३ हजार विद्यार्थ्यांच्या अर्जांचा विचारही या यादीत होणार नसल्याने तिसऱ्या फेरीनंतरच प्रवेशाचे चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणूनच या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या पसंतीक्रमानुसार निश्‍चित झालेले आहेत, त्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अखेरीस विशेष फेरीतच त्यांना अर्ज करता येणार आहे. तसेच सध्या संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन व भाग एक व दोन भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा: अहमदनगर : पोलिस असल्याचा बनाव करणारा जेरबंद

कट ऑफ एक ते दीड टक्क्यांनीच घसरला

शहरातील काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचा अकरावीच्या पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत एक ते दीड टक्क्यांनीच घट झाल्याचे काही प्राचार्यांनी सांगितले. काहींनी वाणिज्य व कला शाखेचा कटऑफ कमी केला आहा. गेल्या वर्षी शेवटच्या यादीसाठी अकरावीच्या फक्त १० ते १२ जागाच शिल्लक राहिल्या होत्या. पहिल्या यादीत मिळालेला प्रवेश रद्द करून दुसऱ्या यादीतील बेटरमेंटनुसार प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या या यादीनंतरच सर्वच जागा भरण्याची शक्यता आहे.

अकरावीचा शाखानिहाय कट ऑफ (२०२१-२२ द्वितीय फेरी)

कनिष्ठ महाविद्यालय...विज्ञान...वाणिज्य...कला

 • अमृता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, निगडी...४३३...४०५...००

 • श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालय...४३८...३३४...२९२

 • सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कनिष्ठ महाविद्यालय...४४८...३१६...००

 • श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय...००...३८०...४२

 • जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय...४७३...३९९...००

 • नवमहाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय...३९४...३५३...२६८

 • कमलनयन बजाज ज्युनिअर कॉलेज...४६४...००...००

 • प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय...४३६...३४०...३५९

 • श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय...४२५...३३३...२०१

 • मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज...४३७...४१३...००

 • भारतीय जैन संघटना ज्युनिअर कॉलेज...४३०...३७४...२२२

loading image
go to top