अकरावीच्या विशेष फेरीत २४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.
Admission
Admissionesakal
Summary

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

पुणे - इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यात २४ हजार ६२३  विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत (ता. ८) प्रवेश निश्चित करता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या प्रवेश फेरीअंतर्गत ५६ हजार ४१३ जागा उपलब्ध होत्या, तर प्रवेशासाठी २९ हजार ४१६ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यातील २४ हजार ६२३ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. त्यातील एक हजार ७२९ विद्यार्थ्यांनी सोमवारीच प्रवेश निश्चित केला. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करणे गरजेचे असल्याचे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले आहे. फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज ‘अनलॉक’ ही सुविधा उपलब्ध होणार नाही. तसेच कोटांतर्गत प्रवेश तसेच द्विलक्षी विषयांसाठीचे प्रवेश स्वतंत्र वेळापत्रकात दर्शविल्याप्रमाणे करत येतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी गुरुवारी (ता.८) रात्री आठ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता.९) पुढील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. विशेष फेरीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पसंती अर्ज भाग दोन भरणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्याने या फेरीत सहभागी होणे गरजेचे आहे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

प्रवेश फेरीनिहाय झालेल्या प्रवेशाचा आढावा :

प्रवेश फेरी : उपलब्ध जागा : पात्र ठरलेले विद्यार्थी : निवड झालेले/महाविद्यालये मिळालेले विद्यार्थी : प्रवेश घेतलेले विद्यार्थी

पहिली नियमित फेरी : ९३,९०६ : ६५५१९ : ४२,६३८ : २५,३८१

दुसरी नियमित फेरी : ६८,५१० : ४१,११५ : १७,०६२ : ७,४४९

तिसरी नियमित फेरी : ६१,०६१ : ३८,६१५ : १२,२५३ : ४,६४८

पहिली विशेष फेरी : ५६,४१३ : २९,४१६ : २४,६२३ : १,७२९ (५ सप्टेंबरपर्यंत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com