Eleventh Class Admission : अकरावी प्रवेश प्रक्रियेला २५ मे पासून होणार सुरवात

तुमचा पाल्याला पुणे-मुंबई सारख्या महानगरांतील शाळांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर आत्ताच तयारीला लागावे लागेल.
Online-Admission
Online-AdmissionSakal

पुणे - तुमचा पाल्याला पुणे-मुंबई सारख्या महानगरांतील शाळांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर आत्ताच तयारीला लागावे लागेल. पुणे व पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील महानगर पालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून, विद्यार्थ्यांना येत्या २५ मे पासून ते इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात. २०२३-२४ या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक राज्याचे नवनियुक्त माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी येत्या २० ते २४ मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात, असे देखील राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

Online-Admission
CUET Exam : केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा जून दरम्यान होण्याची शक्यता

प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल. दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येईल, असे राज्य मंडळातर्फे नमूद करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक विद्यालयांना २० मे ते इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाईल.

अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com