esakal | विद्यार्थ्यांना मिळेना पसंतीचे महाविद्यालय
sakal

बोलून बातमी शोधा

admission

विद्यार्थ्यांना मिळेना पसंतीचे महाविद्यालय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘दहावीच्या परीक्षेत ८५.२० टक्के गुण आहेत, एवढे गुण मिळाल्याने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांकडून भरपूर कौतुक झाले. परंतु, अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये अद्याप हवे ते महाविद्यालय मिळाले नाही. आता नाइलाजास्तव दुसरा आणि तिसरा पर्याय म्हणून निवडलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे,’’ अशा शब्दांत अर्णव (नाव बदललेले आहे) आपल्या भावना व्यक्त करत होता. दहावीत ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या अर्णवसारख्या हजारो विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांचा आग्रह कायम आहे. त्यामुळे प्रवेश फेऱ्यांसाठी पात्र असूनही २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ‘ॲलॉट’पासून लांब राहावे लागत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य बोर्डांच्या दहावीच्या निकालात कमालीची वाढ झाली. तसेच ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

हेही वाचा: मेहकर : जीर्ण टाकी उठली जिवावर, नागरिकांच्या जिवाला धोका

त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ तिसऱ्या फेरीतही नव्वदीपार आहे. दरम्यान शहरातील काही नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेश ‘फुल्ल’ झाले आहेत. त्यामुळे ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीनंतरही प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्रवेश एकूण पात्र निवड निवड प्रवेश घेतलेले

फेऱ्या जागा विद्यार्थी झालेले न झालेले विद्यार्थी

८६,४८२ ५६,७६७ ३८,८५८ १७,९०९ २४,५००

६३,७५७ ३५,६९४ १५,९६७ १९,७२७ ७,६१२

५६,६३५ २९,५०५ ९,२६१ २०,२४४ ---

टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या आणि अद्याप पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी करिअर समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. आपली गुणवत्ता आणि महाविद्यालयांचा कट-ऑफ पाहून पसंतीक्रम नोंदवावा. जेणेकरून महाविद्यालये लवकर ‘ॲलॉट’ होतील. दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयांचा गांभीर्याने विचार करावा. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांना भेटी द्याव्यात. प्राचार्यांशी संवाद साधावा, महाविद्यालयांतील सुविधांची माहिती घ्यावी आणि आपले पसंतीक्रम बदलावेत.

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

हेही वाचा: तीस हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र

बहुतांश विद्यार्थी हे नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, म्हणून अट्टहास करतात. विद्यार्थ्यांनी मिळालेले गुण आणि कट-ऑफ पाहून पसंतीक्रम देणे गरजेचे आहे, तरच विद्यार्थ्यांना लवकर महाविद्यालये ॲलॉट होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालविता आपल्या गुणांनुसार महाविद्यालये निवडावी आणि अकरावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

- मीना शेंडकर, सदस्य सचिव, अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती

नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ जास्त आहे. त्यामुळे दहावीत चांगले गुण मिळूनही पहिल्या पसंतीचे महाविद्यालये अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे आता दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी प्रयत्न करत आहे.

- अथर्व चोपडे, विद्यार्थी

loading image
go to top