

Engineering aspirants should choose their branch by considering future technologies and career opportunities beyond 2035. AI, Data Science, Semiconductor, Robotics, Cyber Security, and Renewable Energy are expected to create significant employment in the coming decade.
sakal
डॉ. संजीव वाघ, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कऱ्हाड
बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेची निवड हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेनुसार आणि नीती आयोगाच्या आगामी तांत्रिक विकास आराखड्यानुसार पुढील दशकात तंत्रज्ञानाधारित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांचा विचार न करता २०३५ आणि त्यापुढील काळातील करिअर संधी लक्षात घेऊन शाखा निवडावी.