esakal | मुलांच्या भविष्याच्या विचार करताय? या गोष्टी घ्या लक्षात| Future Of Children
sakal

बोलून बातमी शोधा

Job

मुलांच्या भविष्याच्या विचार करताय? या गोष्टी घ्या लक्षात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : सध्या सर्वांनाच डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावेसे वाटते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर आणि इंजिनिअर या दोन विद्या शाखा महत्त्वाच्या आहेत. सोबतच पैशांसह प्रतिष्ठा देणाऱ्याही आहेत. यामुळेच की काय या शाखांकडे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवेश आणि शिक्षणानंतरच्या नोकऱ्या यामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. तेव्हा या शाखांना प्रवेश घेताना विविध उपशाखांची नीट माहिती असायला हवी...

दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर सुरू होते भविष्याची चर्चा. ही चर्चा होणे साहजिकच आहे. परंतु, भवितव्य, आवड, कुवत, गरज आणि संधी या सर्वांचा मेळ साधून भवितव्याची वाट शास्त्रशुद्धपणे निवडणारे लोक फार कमी प्रमाणात आहेत. आपण दुर्लक्षित केलेली सगळ्यात मोठी परंतु, तेवढीच महत्त्वाची शाखा म्हणजे अन्न पुरवठा आणि प्रक्रिया. हा विषय शेतीशी संबंधित आहे. शेतकरी नेहमी गरीबच असतो. त्यामुळे या शाखेकडे आपल्याला लक्ष द्यायचे नाही, असा अनेकांचा निर्णय झालेला असतो. विशेषतः ज्यांच्या घरात परंपरागत शेती व्यवसाय असतो त्या घरांमध्ये जीवनाची एवढी अनिश्चितता अनुभवलेली गेलेली असते की त्या घरातल्या सुशिक्षित मुलांना शेतीचे नाव सुद्धा काढू दिले जात नाही.

हेही वाचा: फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

शेतीपासून शक्यतो दूर आणि शेतीशी कसलाही संबंध नसलेला व्यवसाय किंवा शिक्षण घेतले पाहिजे, असा विचार या घरात केला जातो. परंतु, शेती म्हणजे प्रत्यक्षात धान्य उत्पादन, त्याचे विपणन, त्यांच्यावर प्रक्रिया, त्याची विक्री आणि निर्यात या सारख्या कामांचा समावेश असलेल्या अनेक विद्याशाखा आणि व्यवसाय विकसित झाले आहेत. जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात अदभूत असे शोध लागत आहेत आणि लागणार आहेत. या तंत्रज्ञानाशी संबंधित कोल्ड स्टोअरेज आणि त्याचे तंत्रज्ञान हे एक नवे क्षेत्र निर्माण झाले आहे.

पालकांनी हे करावे

 • मुलांच्या भवितव्याचा निर्णय एकट्या पालकांनी घेऊ नये

 • निर्णय घेताना मुलांना विचारात घ्या; मात्र, त्यांच्यावर सक्ती करू नका

 • मुलं फार परिपक्व नसल्याने त्यांच्यावरच फार सोपवू नका

 • त्यांच्या कल्पना वरवरच्या आणि बालिश असू शकतात.

 • मुलांच्या भवितव्याचा निर्णय घेताना शिक्षकांनाही सहभागी करा

 • व्यवसाय मार्गदर्शक हाही एक चौथा घटक निर्णय प्रक्रियेत सहभागी करता येईल

 • भावना, परिस्थिती, मुलांची आवड-निवड, कल आणि कुवत याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.

हेही वाचा: दारूबंदी जिल्‍ह्यातच दारू चोरीवरून मारहाण

यात आहे संधी

 • फॉरेन ट्रेंड

 • बांधकामाशी संबंधित व्यवसाय

 • वाहन उद्योगाशी संबंधित व्यवसाय

 • माहिती तंत्रज्ञान

 • अन्न प्रक्रिया उद्योग

 • चित्रपटाशी संबंधित व्यवसाय

व्यवसाय किंवा उच्च शिक्षणाची शाखा निवडताना सगळे लोक कुठे धावताहेत हे पाहू नका आणि सगळे धावतात म्हणून आपणही त्यामागे धावू नका. आपल्याला काहीवेळा काही व्यवसायामध्ये विचित्र परिस्थिती आढळते. तिथे भरपूर नोकऱ्या असतात. परंतु, ते काम करणारी माणसे मिळत नाहीत. अशा क्षेत्रामध्ये चांगली संधी मिळू शकते आणि चांगले वेतनही मिळू शकते. लोकांची गर्दी नसली तरी आपण त्या क्षेत्रातली भावी काळातली गरज लक्षात घेतली पाहिजे.

- प्रा. मधुकर चुटे

loading image
go to top