Government Job Vaccancies : सरकारी नोकरीत साडेतीन हजार पेक्षा जास्त जागा, १० वी पास करू शकतात अर्ज

सरकारी नोकरीत भरपूर जागा निघाल्या आहेत. इच्छूक उमेद्वार करू शकतात अर्ज
Government Job Vaccancies
Government Job Vaccanciesesakal

​Government Jobs 2022 : नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात नोकरी भरती होणार आहे. ज्यासाठी इच्छूक उमेद्वार दिलेल्या तारखे आधी अर्ज करू शकतात.

इंटेलिजंस ब्युरोमध्ये १६७१ पदांची भरती निघाली आहे. यासाठी उमेद्वाराने मान्याप्राप्त बोर्डातून १० वी पास केलेली असावी. या पदासाठी २१,७०० ते ६९,१०० रूपयांपर्यंत दरमहा पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी www. mha.gov.in या संकेतस्थळावर जावं. याची अंतीम तारीख २५ नोव्हेंबर आहे.

Government Job Vaccancies
Govt Jobs in Maharashtra: मोठी बातमी! राज्यात मेगा भरतीची घोषणा; भरली जाणार ७५ हजार पदे

एएमडी (ऑटोमेटिक मिनरल डायरोक्टोरेट) मध्ये सिक्युरीटी ऑफिसरसह इतर पदांची भरती निघाली आहे. इथे ३२१ जागा आहे. यासाठी उमेद्वार १० वी पास असणं आवश्यक आहे. या पदांसाठी १८ ते ३५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. यासाठी amd.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. १७ नोव्हेंबरच्या आधी अर्ज करावा.

Government Job Vaccancies
Government job : सीमा रस्ता संघटनेत ३२७ जागांवर भरती

आयटीबीपी (ITBP) काँस्टेबलच्या १८६ पदांच्या जागा निघाल्या आहेत. यासाठी उमेद्वार मान्याप्राप्त बोर्डातून १० वी पास असावा. संबंधीत क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदांसाठी २१, ७०० ते ८१,१०० पर्यंत पगार दिला जाईल. यासाठी davp.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे.

Government Job Vaccancies
Government Job 2022 : सरकारी नोकरीची संधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये २१ पदांसाठी भरती

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमीटेडने तामिळनाडूत ट्रेड अपरेंटीसशीप आणि नॉन इंजीनिअरींग अपरेंटीसशीप च्या ९०१ जागा भर्ती केली जाणार आहे. उमेदाराने मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून आयटीआय / एनसीवीटी/ डीटीईटी / सीएएसए / एनटीसी / पीएनटीसी / बीकॉम / बीएससी / बीबीए / बीसीए अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. उमेद्वारांनी www.nlcindia.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com