Government Job 2022 : सरकारी नोकरीची संधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये २१ पदांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २१ पदांसाठी भरती
Government Job 2022
Government Job 2022 esakal

पुणे : सरकारी नोकरीत भर्ती होण्यासाठी अनेक तरूण मेहनत करतात. एक पोस्ट काढण्यासाठी कमी वेळात जास्त अभ्यास करावा लागतो. पण, अभ्यास करत असताना सरकारी नोकरीच्या भरतीसाठी निघण्याची वाट पहावी लागते. पण, आता स्टाफ सिलेक्शन कमिशनने तरूणांना ती संधी उपलब्ध करून दिली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २१ पदांसाठी भरती होणार आहे.

Government Job 2022
Government job : ONGCमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; पगार ६० हजार

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर,असिस्टंट आयकर निरीक्षक यासह २१ पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी भरती ग्रुप ‘B’ असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, आयकर निरीक्षक, इस्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी ग्रुप ‘C’ ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कर सहाय्यक सब-इंस्पेक्टर.

Government Job 2022
Government job : १०वी उत्तीर्ण, ITI पात्रताधारकांसाठी नोकरीची संधी

उच्च श्रेणी लिपिक

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व 12 वीत गणितामध्ये किमान 60% गुण उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. वयोमर्यादा काही पदांसाठी उमेदवाराचे वर 01 जानेवारी 2022 रोजी १८ ते ३० यातील असावे. तर काही पदांसाठी २८ ते २७ इतके असावे. या पदांसाठी एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षे तर ओबीसीसाठी 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 असून यासाठी १०० रूपये फि आकारली जाणार आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा : https://ssc.nic.in/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com