esakal | बंपर भरती! बँक, रुग्णालय, रेल्वेसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs

शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांकरिता नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालीय.

बँक, रुग्णालय, रेल्वेसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांकरिता नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालीय. महाराष्ट्र बँकेपासून (Maharashtra Bank) जोधपूर एम्सपर्यंत.. (Jodhpur AIIMS) भारतीय रेल्वे (Indian Railway) आणि राजस्थान कर्मचारी निवड आयोगाने (Rajasthan Staff Selection Commission) नुकतीच रिक्त पदांसाठी भरती काढलीय. आता तरुणांना त्यांच्या पात्रता आणि इच्छेनुसार, शासकीय पदांसाठी अर्ज करता येणार आहे. SO भरती 2021 अंतर्गत महाराष्ट्र बँकेत एकूण 190 जागा आहेत. तसेच रेल व्हील फॅक्टरीमध्ये ट्रेड अप्रेंटिससाठी 192 जागा रिक्त असून यासाठी ITI चे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. याबरोबरच राजस्थान कर्मचारी निवड आयोगाने 250 संगणक पदांसाठीही भरती जारी केलीय.

बँक ऑफ महाराष्ट्र : 190 जागा रिक्त

बँक ऑफ महाराष्ट्रने स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल- I आणि II पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत एकूण 190 जागा रिक्त आहेत. यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइटवर bankofmaharashtra.in आपला अर्ज भरु शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबरपर्यंत आहे.

'एम्स'मध्ये नर्स स्टाफसह अनेक पदांवर भरती

एम्स जोधपूरने प्रोजेक्ट स्टाफ नर्ससह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइटव्दारे aiimsjodhpur.edu.in अर्ज करू शकतात. एकूण 10 रिक्त पदांवर ही भरती केली जाईल.

हेही वाचा: आता वार्षिक परीक्षेसाठी 9 वी, 11 वीची 'प्रश्नपत्रिका' बोर्ड तयार करणार!

रेल्वे भरतीत 10 वी विद्यार्थ्यांनाही संधी

रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची चांगली संधी उपलब्ध झालीय. रेल व्हील फॅक्टरीने ट्रेड अप्रेंटिसच्या पदांवर एकूण 192 पदे भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवार rwf.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. आरडब्ल्यूएफ अप्रेंटिस भरतीच्या 192 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे.

राजस्थानमध्ये 250 रिक्त जागा

राजस्थान कर्मचारी निवड मंडळाने (RSMSSB) संगणक भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. या अंतर्गत एकूण 250 पदांची भरती केली जाणार आहे. राजस्थान एसएसबी संगणक भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज देखील करु शकता. यासाठी उमेदवार, 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत राजस्थान कर्मचारी निवड मंडळाच्या वेबसाइटला rsmssb.rajasthan.gov.in भेट देऊ शकतात. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. अधिसूचनेनुसार, अनुसूचित नसलेल्या क्षेत्रांसाठी संगणक भरतीमध्ये 220 आणि अनुसूचित क्षेत्रांसाठी 30 जागा रिक्त असतील.

loading image
go to top