संवाद : स्वयंशिस्त हाच यशाचा मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Self-Discipline

शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मन एकाग्र होत नाही ही प्रमुख समस्या दिसून येते.

संवाद : स्वयंशिस्त हाच यशाचा मार्ग

- हर्षा पिसाळ

शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मन एकाग्र होत नाही ही प्रमुख समस्या दिसून येते. परीक्षेत यश प्राप्त करावयाचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. पण आत्ताची मुले मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स व मित्र-मैत्रिणी या गोष्टींमध्ये सर्वात जास्त वेळ घालवताना दिसून येतात.

अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर स्वयंशिस्त असणं खूप महत्त्वाचे आहे. Anything is possible with self discipline स्वयंशिस्त म्हणजे काय? तर स्वयंनियंत्रण तसेच, आपण स्वतःशी प्रामाणिक राहून स्वयंप्रेरणेने एखादी कृती सातत्यपूर्ण करत रहाणे म्हणजे स्वयंशिस्त. प्रत्येक गोष्टीत, कृतीत व कामात स्वयंशिस्त असेल तर यश हमखास मिळतेच. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी स्वयंशिस्त असणे खूप फायद्याचे ठरते.

अभ्यासासाठी स्वयंशिस्त लावून घेण्यासाठी पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरतील.

  • आठवड्याचे विषयानुसार वेळापत्रक तयार करा. त्यानुसार दिवसातील तासांचे नियोजन करून, अभ्यासाचे उद्दिष्ट निश्चित करा.

  • अभ्यास करण्यासाठी वातावरण शांत असेल अशा खोलीची निवड करा.

  • आठवड्याचे अभ्यासाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास स्वतःला प्रोत्साहन द्या तसेच, काही कारणांनी उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास स्वतःचे परीक्षण करून, झालेल्या चुका शोधा व पुढील वेळीस चुका टाळण्याचा प्रयत्न करा.

  • अभ्यास करताना मोबाईल, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक गॅझेट दूर ठेवा.

  • सलग ४५ मिनिटांपेक्षा जास्त अभ्यास करू नका. मध्ये-मध्ये थोडा ब्रेक घ्या.

  • ब्रेक मध्ये शारीरिक हालचाली करा उदा. चालणे

  • अभ्यासाच्या पद्धतीत सातत्य ठेवा.

  • केलेल्या अभ्यासाचे पुन्हा-पुन्हा आकलन करा. आकलन केल्याने विद्यार्थी स्वतःचे मूल्यमापन करू शकतात. आणि निश्चित उद्दिष्ट गाठण्यासाठी आपले प्रयत्न वाढवू शकतात.

  • रोज सात ते आठ तास पुरेशी झोप घ्यावी.

  • शरीराला ज्याप्रमाणे पुरेशी झोप आवश्यक आहे, त्याप्रमाणेच चांगला सकस आहारही आवश्यक आहे. आहारात पौष्टिक (दूध, अंडी, फळे, कडधान्ये व हिरव्या पालेभाज्या) खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

वरील गोष्टी अमलात आणल्यास विद्यार्थ्यांना शंभर टक्के यश मिळेल. प्रेरणेने काम कराच,पण कामात स्वयंशिस्त असेल तर यशाला पादाक्रांत करता येते.

(लेखिका आपटे प्रशालेत सहाय्यक शिक्षिका आहेत.)

Web Title: Harsha Pisal Writes Self Discipline Is The Way To Success

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobDiscipline