esakal | बारावीच्‍या पुरवणी परीक्षेला उद्यापासून सुरवात; नाशिक विभागात २९ केंद्रांवर होणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

exam

बारावीच्‍या पुरवणी परीक्षेला उद्यापासून सुरवात

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : इयत्ता बरावीची (HSC) सप्‍टेंबर-ऑक्‍टोबर महिन्‍यातील पुरवणी परीक्षेला गुरुवार (ता.१६) पासून सुरवात होत आहे. या परीक्षेत नाशिक जिल्‍ह्यातील ५०८ विद्यार्थ्यांसह विभागातून एकूण ७३८ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. यात कला शाखेचे सर्वाधिक ३९९ विद्यार्थी आहेत. विभागातील २९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

विद्यार्थ्यांना 'या' परीक्षेच्‍या माध्यमातून संधी

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे इयत्ता दहावी, बारावीच्‍या लेखी परीक्षा होऊ शकल्या नव्‍हत्या. या पार्श्वभूमीवर मूल्‍यमापनाच्‍या आधारावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शासन स्‍तरावर घेतला होता. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील सूत्रही जाहीर केले होते. त्‍यानुसार निकाल लावण्यात आला. या निकालातही काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्‍या माध्यमातून संधी उपलब्‍ध करून दिली होती. त्‍यानुसार ही परीक्षा सप्‍टेंबर-ऑक्‍टोबर महिन्‍यात होत आहे. बारावीची लेखी परीक्षा गुरुवार (ता.१६) पासून सुरू होणार असून, ११ ऑक्‍टोबरपर्यंत चालणार आहे.

दहावीची २२ पासून परीक्षा

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २२ सप्‍टेंबरपासून सुरू होणार असून, ८ ऑक्‍टोबरपर्यंत लेखी पेपर होतील. या परीक्षेसाठी नाशिक जिल्‍ह्यातून ४०७, तर नाशिक विभागातून एकूण ५८१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

हेही वाचा: JSW कंपनीचा राज्य शासनासोबत करार; रोजगार होणार उपलब्ध

जिल्‍हानिहाय प्रविष्ठ विद्यार्थी (जुना, नवीन शिक्षणक्रम)

जिल्‍हा विज्ञान कला वाणिज्‍य

नाशिक १०१ २६७ ८८

धुळे १३ ३५ ४

जळगाव २७ ७३ १६

नंदुरबार १७ २४ १

एकूण १५८ ३९९ १०९

हेही वाचा: 'डीपी'तील 122 विद्यार्थ्यांना नोकरीची 'प्लेसमेंट'

loading image
go to top