इंजिनिअरिंग झालंय? हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये निघालीय मोठी भरती

HPCL
HPCL

HPCL recruitment 2021 : पुणे : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरच्या सुमारे २०० पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. यासंबंधीची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे. 

पदभरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ एप्रिल २०२१ पर्यंत उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे - 
१. मेकॅनिकल इंजिनिअर - १२० पदे
२. सिव्हील इंजिनिअर - ३० पदे
३. इलेक्ट्रिकल इंजिनिअर - २५ पदे
४. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर - २५ पदे

आवश्यक पात्रता -
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांना इंजिनिअरिंगच्या ४ वर्षांमध्ये ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५० टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे.

वयोमर्यादा - 
- खुल्या किंवा सर्वसाधारण गटातील उमेदवाराचे वय हे २५ वर्षापेक्षा जास्त नसावी.
- ओबीसीमधील उमेदवारांना ३ वर्षे तर अनुसूचित जाती आणि जमातीमधील उमेदवारांना ५ वर्षे सवलत देण्यात येत आहे. 

अर्ज शुल्क - 
सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे मूल्य भरावे लागणार नाही, याची नोंद घ्यावी. 

निवड प्रक्रिया -
उमेदवाराची निवड ही संगणक आधारीत चाचणी, ग्रुप टास्क, वैयक्तिक मुलाखत यातील गुणांच्या आधारे करण्यात येईल. संगणक आधारीत चाचणीत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. ही चाचणी दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. संगणक आधारीत चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीला प्रवेश मिळेल. 

वेतनमान - 
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (Online Application) करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com