"आयबीपीएस'तर्फे विविध पदांच्या मुलाखतींसाठी हॉल तिकिट्‌स जाहीर ! असे करा डाउनलोड

आयबीपीएसतर्फे विविध पोस्टच्या मुलाखतींसाठी हॉल तिकिटे जाहीर
IBPS
IBPSEsakal

सोलापूर : "इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शन' (आयबीपीएस)ने विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींच्या परीक्षांचे प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) जाहीर केले आहे. तर, ज्या उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती आणि आता मुलाखतीसाठी हजेरी लावू इच्छितात, ते आयबीपीएसच्या अधिकृत साइट ibps.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. याशिवाय खाली दिलेल्या सोप्या टप्प्यांचे अनुसरण करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

आयबीपीएस मुलाखतीच्या फेरीसाठी असे करा प्रवेशपत्र डाउनलोड

आयबीपीएसने विविध पोस्टकरिता जाहीर केलेल्या मुलाखतीसाठी उमेदवारांनी आधी अधिकृत साइट ibps.in वर जावे. यानंतर, होम पेजवर उपलब्ध असलेल्या "आयबीपीएस ऍडमिट कार्ड 2021' लिंकवर क्‍लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवार लॉग इन तपशील प्रविष्ट करू शकतात. यानंतर, आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल. प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा. पुढील आवश्‍यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी काढून ठेवा.

16 ते 22 एप्रिल दरम्यान प्रवेशपत्र अधिकृत साइटवर मिळेल, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. यादरम्यान प्रवेशपत्र डाउनलोड करा. इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शनने जारी केलेल्या मुलाखत प्रवेश पत्रात मुलाखतीची तारीख व ठिकाण दिले आहे. ऍडमिट कार्डवर उपलब्ध असलेली माहिती उमेदवारांनी संपूर्णपणे वाचली पाहिजे आणि त्यानुसार मुलाखतीसाठी पोचले पाहिजे. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, मुलाखत आणि इतर प्रक्रियेचा समावेश आहे. तर या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com