ICAI CA Foundation Result 2023 : ICAI CA फाउंडेशन निकाल आज होणार जाहीर! कुठे अन् कसा तपासाल? जाणून घ्या सविस्तर

icai ca foundation result 2023 to be release today know how to check result
icai ca foundation result 2023 to be release today know how to check result

ICAI CA Foundation Result 2023 : इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेद्वारे आज म्हणजेच 7 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत आयसीएआय सीए फाउंडेशन निकाल घोषित केला जाऊ शकतो. अधिकृत माहितीनुसार, आयसीएआय सीए जून 2023 फाउंडेशन निकाल 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा किंवा 8 ऑगस्ट रोजी सकाळी जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात.

आयसीएआय सीए फाउंडेशन निकालाची तारीख आणि वेळ घोषित करण्यासंबंधी अधिसूचना 3 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली. आयसीएआय सीए फाउंडेशनचा निकाल ICAI च्या अधिकृत वेबसाइट (icai.nic.in) वर घोषित केला जाईल. जून 2023 च्या सत्राच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि इतर तपशील टाकून निकाल तपासू शकतील.

icai ca foundation result 2023 to be release today know how to check result
Gyanvapi Masjid : मंदिराखालचं तळघर अन् बेपत्ता राणी...; 'ज्ञानवापी'बद्दल काँग्रेस अध्यक्षांनी लिहिलेली गोष्ट नेमाडेंनी सांगितली

आयसीएआय सीए फाउंडेशन निकाल कसा तपासाल?

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर निकालाची लिंक (https://icai.nic.in/caresult/) वर क्लिक करा.

  • वैयक्तिक डिटेल्स एंटर करून सबमिट करा.

  • निकाल तुमच्या समोर उघडेल.

  • निकालाची प्रत डाउनलोड करा.

icai ca foundation result 2023 to be release today know how to check result
Shasan Aplya Dari Jejuri : मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, अजित पवार जेजुरी गडावर! खंडेरायाचं घेतलं दर्शन

CA फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना किमान 40$ आणि एकूण 50% गुण मिळणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी नापास मानले जातील. परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून त्यांची कोणतीही महत्त्वाची माहिती चुकणार नाही. सीएची परीक्षा मे-जूनमध्ये देशातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com