esakal | इन्कम टॅक्स विभागात काम करण्याची संधी; पगार महिन्याला 1.4 लाख
sakal

बोलून बातमी शोधा

income tax

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. आयकर विभागामध्ये काम करु पाहणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे.

इन्कम टॅक्स विभागात काम करण्याची संधी; पगार महिन्याला 1.4 लाख

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Income Tax Department Recruitment 2021: कोरोना महामारीचा सर्वच छेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. या काळात हजारोंच्या संख्येने लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. अशावेळी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. आयकर विभागामध्ये काम करु पाहणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त यांनी स्पोर्ट्स कोटाअंतर्गत मल्टी-टास्किंग स्टाफ, इन्कम टॅक्स इन्सपेक्टर आणि टॅक्स असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छूक उमेदरावांना या पदासाठी अर्ज करायचा असेल तर ते आयकर विभागाच्या incometaxmumbai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करुन शकतात. याशिवाय उमेदवार सरळ https://www.incometaxmumbai.gov.in/ वर क्लिक करुन या पदांसाठी अर्ज करु शकतात. याअंतर्गत एकूण 155 पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.

हेही वाचा: अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा होणार! सोमवारपासून अर्ज दाखल

Income Tax Department Recruitment 2021 साठी रिक्त जागा

MTS – 64 जागा

टॅक्स असिस्टेंट – 83 जागा

इन्कम टॅक्स इन्सपेक्टर – 8 जागा

अर्ज करण्यासाठी पात्रता

MTS- उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी पास केली पाहिजे

इन्कम टॅक्स इन्सपेक्टर - उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी घेतलेली असावी

टॅक्स असिस्टेंट- उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी घेतलेली असावी

हेही वाचा: दहावीनंतर पुढे काय? अभियांत्रिकीचा पर्याय

वयाची मर्यादा

इन्कम टॅक्स इन्सपेक्टर - उमेदवाराचे वय 18 ते 30 च्या दरम्यान असावे

टॅक्स असिस्टेंट- उमेदवाराचे वय 18 ते 27 च्या दरम्यान असावे

मल्टी टास्किंग स्टाफ- उमेदवाराचे वय 18 ते 25 च्या दरम्यान असावे

वेतन किती असेल?

MTS- वेतन स्तर-1 (18000 रुपये ते 56900 रुपये)

टॅक्स असिस्टेंट- वेतन स्तर-4 (रु. 25500 ते रु. 81100)

इन्कम टॅक्स इन्सपेक्टर -वेतन स्तर -7 (44900 रुपये ते 142400 रुपये)

loading image