esakal | अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा होणार! सोमवारपासून अर्ज दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा होणार! सोमवारपासून अर्ज दाखल

सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असून वेबसाईटवरची लिंक देण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा होणार! सोमवारपासून अर्ज दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : अकरावी प्रवेशासाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षा (CET exam) २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज (Application) भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (ता. १९ जुलै) सुरू करण्यात येणार आहे. सीईटीसाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असून या पोर्टलची लिंक महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. त्या माध्यमातून सीईटी द्यायची की नाही, विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे.

हेही वाचा: सांगली, मिरजेला बस परत; कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त

दहावीचा निकालाची विद्यार्थी व पालकमध्ये फारशी उत्सुकता नव्हती. औपचारिकता म्हणूनच यंदा दहावीच्या निकालाकडे पाहण्यात आले. असे असले तरी ११ वी प्रवेशासाठी चांगल्या शाळांमध्ये प्रवेशासाठी निकाल लागण्यापूर्वीच पालकांना शाळांमध्ये प्रवेश निश्‍चित केले होते. ११ वी शास्त्र शाखेच्या खासगी शिकवण्या वर्गही सुरू करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा: तासगाव-सांगली रोडवरील कोल्ड स्टोअरेजला भीषण आग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३९ हजार ६११ विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची वेध लागले आहेत.

हेही वाचा: सांगली : दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच पद्धतीने खून; मांजर्डेतील घटना

सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असून वेबसाईटवरची लिंक देण्यात येणार आहे. या लिंकवर विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक टाकल्यानंतर सीईटी द्यायची की नाही द्यायची किंवा नाही असे दोन पर्याय विचारले जातील. विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी एक पर्याय म्हणून नोंदणी करायची आहे. सीईटी देवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पर्याय निवडल्यानंतर त्याचा परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल होईल.

हेही वाचा: सांगली डॉट कॉम; महापालिका प्रशासन आरोपांच्या पिंजऱ्यात

सीईटी परीक्षा ऐच्छिक मग प्रवेश कसे?

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. मात्र सीईटीच्या गुणावरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. सीईटच्या गुणांवर पहिले प्रवेश होतील. त्यानंतर ज्यांनी सीईटी परीक्षा दिलेली नाही. त्यांचेही दहावीच्या गुणावर प्रवेश निश्‍चित होवू शकतात. याचा अर्थ असा आहे की, नामांकीत महाविद्यालयात प्रवेशासाठी रांगा असतील तर अन्य महाविद्यालयांसह विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेशासाठी फारशी रस्सीखेच असणार नाही.

loading image