esakal | दहावीनंतर पुढे काय? अभियांत्रिकीचा पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra SSC result 2021

दहावीनंतर पुढे काय? अभियांत्रिकीचा पर्याय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दहावी आणि बारावी हे शैक्षणिक कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे आहेत. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी बारावी सायन्सनंतर जेईई, एमएचटी सीईटी, तसेच विविध विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा देणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहेत. दहावीत चांगले गुण मिळवलेला विद्यार्थी बारावी आणि त्यानंतर प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवेलच याची खात्री नसते. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रम निवडण्याचा दुसरा पर्याय म्हणजे दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका प्रवेश घेणे.

विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेता येतो. ‘एआयसीटीई’च्या नियमावलीनुसार अभियांत्रिकीच्या मान्यताप्राप्त जागांपैकी फक्त १० टक्के जागा पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असतात. परिणामी विद्यार्थ्यांना तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यामुळे तिसरा पर्याय हा अधिक आश्वासक ठरतो, तो म्हणजे दहावीनंतर सहा वर्षाचे अभियांत्रिकी शिक्षण, त्याला इंटिग्रेटेड बी. टेक. असे म्हणतात.

हेही वाचा: ‘मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर’; ठाकरे सरकारवर टीका

आपण व्यावसायिक शिक्षणाचा विचार करत असल्यास आणि तेही अभियांत्रिकीमध्ये, तर ‘इंटिग्रेटेड बी.टेक’ हा एक आश्वासक आणि नावीन्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहे. पुण्यात ‘डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’मध्ये हा अभ्यासक्रम आहे. इंटिग्रेटेड बी. टेक.मध्ये चार ऐवजी सहा वर्ष अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या शाखेमध्ये प्रावीण्य मिळवता येते. अभ्यासक्रमाची रचना ही विद्यार्थ्यांची गणित आणि विज्ञान विषयांची पायाभरणी करणारी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकीच्या विषयाबद्दल आवड निर्माण होते. यातून तांत्रिक कौशल्य आणि शोधक वृत्ती तयार होऊन ती जोपासली जाते. यासोबतच काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात चार ते आठ महिने प्रशिक्षणाची (इंटर्नशिपची) संधी उपलब्ध दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर करण्याचा अनुभव प्राप्त होतो. परिणामी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.

हेही वाचा: द्राक्षे आंबट होऊ देऊ नका; अमोल कोल्हेंना शिवसेनाचा इशारा

अभियांत्रिकीचा पर्याय निवडताना खूप विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. दहावीनंतर इंटिग्रेटेड बी.टेक. हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. यात विद्यार्थ्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास चांगला होतो. अभियांत्रिकीला लवकर सुरुवात केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकीचा पाया पक्का होतो आणि तांत्रिक कौशल्य मिळते. त्याचा फायदा त्याला त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये नक्कीच होऊ शकतो.

- प्रा. नाथराव जाधव, सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे

loading image