
या पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
UPSC recruitment 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) सहाय्यक संचालक, तज्ज्ञ ग्रेड-२ सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संचालक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत २८ जानेवारी २०२१ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यूपीएससीने प्रसिद्ध केलेली अधिसूचना पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे. कारण चुकीचा पर्याय किंवा तपशील भरला गेल्यास तो रद्द करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे एकूण ४६ पदे भरण्यात येणार आहे.
- लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात झाली IAS
या तारखा लक्षात ठेवा
- ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख : २८ जानेवारी २०२१
- ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : २९ जानेवारी २०२१
यूपीएससी भरती २०२१ : तपशील
- सहाय्यक संचालक - १ पद
- विशेषज्ञ ग्रेड सहाय्यक (त्वचाविज्ञान, व्हेनिरोलॉजी आणि कुष्ठरोग) - ६ पदे
- प्राध्यापक (वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) - 7 पोस्ट
- विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक
- विशेषज्ञ ग्रेड सहाय्यक (नेत्ररोगशास्त्र) - १३ पदे
- विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोगशास्त्र) - १९ पदे
- विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (पेडियाट्रिक कार्डियोलॉजी) - २ पदे
- विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (बालरोग तज्ज्ञ) - १ पद
- विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (प्लास्टिक अॅण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी) - ६ पदे
- सहाय्यक संचालक (बॅलिस्टिक), न्यायवैद्यक प्रयोगशाळा, गृह विभाग - १ पद
- UPSC CDS(I) 2021: कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; लगेच करा डाउनलोड
शैक्षणिक पात्रता -
सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केली असावी. स्पेशॅलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (त्वचाविज्ञान, व्हेनिरोलॉजी आणि कुष्ठरोग) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीबीएस, गायनॉलॉजी, स्त्री रोग, पेडियाट्रिक कार्डिओलॉजी, पेडियाट्रिक सर्जरी याविषयात पदवी असणे आवश्यक आहे.
तसेच सहाय्यक संचालक पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा, गृह विभाग भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बीएससी या विषयातून पदवी प्राप्त केलेली असावी.
- DRDO Jobs: तरुण-तरुणींनो, कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी
अशी होईल निवड
या पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती मिळवू शकतात.
- UPSC ची अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
- UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)