esakal | आर्मीत नोकरीची संधी! दहावी-बारावी विद्यार्थी करु शकतात अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

भारतीय सैन्यात विविध पदांसाठी नुकतेच अर्ज मागविण्यात आले आहेत. आपण इच्छुक असल्यास या पदांसाठी अर्ज देखील करू शकता.

आर्मीत नोकरीची संधी! दहावी-बारावी विद्यार्थी करु शकतात अर्ज

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्यात (Indian Army) विविध पदांसाठी नुकतेच अर्ज मागविण्यात आले आहेत. आपण इच्छुक असल्यास या पदांसाठी अर्ज देखील करू शकता. मात्र, यासाठी काही महत्त्वाची पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागेल. इंडियन आर्मी 9 जानेवारी 2022 ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत हरियाणाच्या हिसार मिलिटरी स्टेशन (Hisar Military Station) येथे भरती मेळाव्याचे आयोजन करणार आहे. या भरतीमध्ये हिसार, फतेहपूर, जिंद आणि सिरसा जिल्ह्यातील तरुण सहभागी होतील. या माध्यमातून कॉन्स्टेबल जीडी (Constable GD), कॉन्स्टेबल लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक श्रेणीतील पदांसाठी भारतीय सैन्यात भरती होता येईल. इच्छुक उमेदवार 13 ऑगस्टपर्यंत joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी नोंदणी करू शकतात. दरम्यान, 25 डिसेंबर 2021 पासून प्रवेशपत्रे दिली जातील. (Indian Army Recruitment 2021 Jobs In Indian Army 10th 12th Pass Can Also Apply Check Here Eligibility Criteria)

कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी (ऑल आर्म्स) वयोमर्यादा 17 ते 21 दरम्यान असणे आवश्यक आहे, तर 1 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. याशिवाय प्रत्येक विषयांत किमान 45 टक्के गुणांसह 10 वी पास असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक विषयात 33 टक्के गुणही गरजेचे आहेत.

हेही वाचा: 'JEE Main'च्या तिसर्‍या सत्रासाठी 15 जुलैला जाहीर होणार Admit Card!

कॉन्स्टेबल लिपीक / स्टोअर कीपर टेक्निकलसाठी वयोमर्यादा 17 ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे, तर 1 ऑक्टोबर 98 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. या व्यतिरिक्त कोणत्याही विषयात किमान 60 टक्के गुण आणि प्रत्येक विषयात 50 टक्के गुणांसह कोणत्याही प्रवाहात 12 वी पास असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: KVS School : 'या' विद्यार्थ्यांसाठी 'Notification' होऊ शकते जाहीर

टेक्निकलसाठी वयोमर्यादा 17 ½ ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तर 1 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक विषयात 40 टक्के गुणही गरजेचे आहेत.

Indian Army Recruitment 2021 Jobs In Indian Army 10th 12th Pass Can Also Apply Check Here Eligibility Criteria

loading image