भारतीय तटरक्षक दलाच्या नाविक अन्‌ यांत्रिकी भरती परीक्षेचा निकाल जाहीर ! असे करा चेक

भारतीय तटरक्षक दलाच्या नाविक अन्‌ यांत्रिकी भरती परीक्षेचा निकाल जाहीर
Coast Guard
Coast GuardCanva

सोलापूर : भारतीय तटरक्षक दलाने नौदल भरती परीक्षेचा निकाल (Coast Guard Navik Result 2021) आणि मेकॅनिकल (Coast Guard Yantrik Result 2021) 2021 चा निकाल जाहीर केला आहे. त्याप्रमाणे, नेव्हीगेटर (जनरल ड्यूटी आणि डोमेस्टिक शाखा) स्टेज वन आणि मेकॅनिकल (इलेक्‍ट्रिकल / इलेक्‍ट्रॉनिक्‍स / मेकॅनिकल) परीक्षेत हजेरी लावलेला उमेदवार आत्ताच अधिकृत साइट joinindiancoastguard.cdac.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल तपासू शकतो. यासाठी उमेदवारांना आवश्‍यक तपशील भरावा लागेल. याशिवाय उमेदवार खाली दिलेल्या टप्प्यां अनुसरण करून निकाल पाहू शकतात. (Indian Coast Guard announces results of Sailor and Mechanical Recruitment Test)

असे तपासा नाविक आणि यांत्रिकी परीक्षेचा निकाल

नाविक व यांत्रिकी भरती परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी आधी joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. यानंतर होम पेजवर उपलब्ध इंडियन कोस्ट गार्ड निकाल 2021 लिंकवर क्‍लिक करा. यानंतर लॉगइन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्‍लिक करा. यानंतर आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल. निकाल तपासल्यानंतर त्याचा प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी ठेवा.

Coast Guard
वय अवघं 13 वर्षे ! आयुष्मानने बनवली साबणाचे पाणी रिसायकल करणारी मशिन

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की ज्यांनी स्टेज- 1 परीक्षेत यश मिळविले आहे त्यांना स्टेज- 2 परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. त्याचबरोबर स्टेज- 2 चे ई- प्रवेशपत्र उपलब्ध रिक्त जागांनुसार दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचण्या, कागदपत्र तपासणी आणि इतर बाबी होणार आहेत. कोस्ट गार्ड मेकॅनिकल आणि नेव्हीगेटर भरती परीक्षा मार्च महिन्यात झाली होती. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 358 पदे नेमली जातील. त्याच वेळी, या भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि 19 जानेवारी 2021 पर्यंत चालली.

भारतीय तटरक्षक दलाद्वारे घेण्यात आलेल्या कोस्ट गार्ड नाविक निकाल आणि मेकॅनिकल (कोस्ट गार्ड यांत्रिक निकाल) परीक्षा संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com