

IIM Mumbai Job Vacancy
ESakal
मुंबई : देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईने तरुणांसाठी एक उत्तम करिअर संधी जाहीर केली आहे. संस्थेने कंत्राटी तत्त्वावर मॅनेजमेंट ट्रेनीच्या १० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत, ॲनालिटिक्स अँड डिसिजन सायन्स, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन, सस्टेनेबल मॅनेजमेंट, ओबीएचआर, मार्केटिंग आणि ॲडमिन या विभागांमध्ये नेमणुका केल्या जातील.