
मराठमोळ्या अन्सारची Inspirational स्टोरी आजही अंगावर काटा आणते, वाचा सर्वात तरुण IAS अधिकाऱ्याची कहानी
मनात जर इच्छाशक्ती, जिद्द असेल तर सर्व काही शक्य असते. या गोष्टीचा प्रत्यय दिलाय अन्सार शेखने. वयाच्या 21 व्या वर्षी, अन्सार शेखने 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC पास केले आणि भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी होण्याचा रेकॉर्ड आपल्या नावी केला. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांसाठी तो आज खुप मोठी प्रेरणा आहे. त्याने या परीक्षेत 275 पैकी 199 स्कोअर केला होता. (Inspirational story of IAS officer Ansar Shaikh Who created history by becoming indias youngest ias officer)
हेही वाचा: प्रशांत किशोर दोन दिवसांपासून हैदराबादमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुक्काम
भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी अन्सार हा महाराष्ट्रातील मराठवाडा येथील आहे. अन्सार हा सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा. त्यामुळे लहानपणापासूच संघर्ष त्याच्या वाटेला होता. त्याचे वडील, योनूस शेख अहमद, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेलगाव या दुष्काळग्रस्त गावात ऑटोरिक्षा चालक होते. त्यांना दारूचे व्यसन होते आणि धक्कादायक म्हणडे त्यांनी तीनदा लग्न केले. शेतात काम करणारी अन्सारची आई ही दुसरी पत्नी होती.
हेही वाचा: आशिष मिश्रा यांनी केले आत्मसमर्पण; लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी
जुन्या आठवणींना उजाळा देताना अन्सार सांगतो की घरगुती हिंसाचार आणि बालविवाह पाहून तो मोठा झाला त्याच्या बहिणींचे 15 व्या वर्षी लग्न झाले तर त्याच्या धाकट्या भावाने सातव्या वर्गात शाळा सोडून कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी गॅरेजमध्ये काम केले आणि अन्सारला UPSC परीक्षा देण्यासाठी मदत केली.
अन्सारने गरिबी सह कुटूबांची वाईट परिस्थिती अगदी जवळून पाहिली. देशातला सर्वात तरुण आयएएस अधिकारी बनल्यानंतरही त्याने सर्व गोष्टींचा प्रबळ इच्छाशक्तीने सामना केला.
जगभरातील तिसरी सर्वात कठीण परीक्षा म्हणून UPSC ला ओळखले जाते. अनेक वर्ष सातत्यपूर्ण मेहनत घेत भारतातील लाखो जण या परीक्षेसाठी प्रयत्न करतात.
Web Title: Inspirational Story Of Ias Officer Ansar Shaikh Who Created History By Becoming Indias Youngest Ias Officer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..